खडसे यांचे घोटी – इगतपुरीत जंगी स्वागत

0
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे घोटी – इगतपुरीत जंगी स्वागत.

इगतपुरी – उत्तर महाराष्ट्राचे हेविवेट नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या घोटी – इगतपुरी मध्ये जंगी स्वागत करण्यात आले. नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे तो आणखीनच मजबूत करण्यासाठी आपणही हातभार लावू असा विश्वास माजी मंत्री खडसे यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, संदीप गुळवे, बाळासाहेब गाढवे, केरूदादा खतेले, संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारूंगसे आदी पदाधिका-यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत जळगाव जिल्हा बँक अध्यक्षा रोहीणीताई खडसे ह्या होत्या.
या प्रसंगी तुकाराम वारघडे, नासाका माजी संचालक रतन जाधव, महेश शिरोळे, प्रशांत कडु, जगन कदम, किरण मुसळे, नारायण वळकंदे, वसीम सैय्यद, पोपटराव भागडे, वंसत भोसले, हरीश चव्हाण, नामदेव भोसले, काशिनाथ कोरडे, सुरेश कोकणे, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.