घरगूती गणेशोत्सव लोक आरास स्पर्धेचे कोजागिरीला पारितोषिक वितरण

0

• जगद्गुरू शंकराचार्यांच्या उपस्थिती मध्ये होणार भव्य दिव्य अनोखा सोहळा.

वेद पाठशाळेचे साखरे गुरुजी शांती पाठ सह करणार शास्त्रोक्त पद्धतीने गणपती अथर्वशीर्ष एक आवर्तन

• भरत अमळकर, रतनलाल बाफना, सचिन नारळे यांची प्रमुख उपस्थिती

• ज्येष्ठ रंगकर्मी हर्षल पाटील करणार संचलन

महाराष्ट्रातील प्रख्यात, नामवंत, प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार, सचिन मुसळे, दीपक पाटील, यांनी केले परीक्षण

जळगाव- रतनलाल सी बाफना ज्वेलर्स पुरस्कृत आणि लोकशाही , लोक लाईव्ह च्या वतीने घेण्यात आलेल्या घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धेबाबत ची शिगेला पोहचलेली उत्सुकता आता संपणार असून कोजागिरी, 30 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता या अभूतपूर्व स्पर्धेचा निकाल घोषित होणार आहे.

शंकरचार्यांची उपस्थिती आणि आशीर्वचन

हिंदू धर्माचे शक्तिपीठ करवीर येथील जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती हे या अनोख्या आणि भव्यदिव्य ऐतिहासिक अशा पारितोषिक वितरण सोहळ्यास उपस्थित राहणार असून या निमित्ताने साऱ्या महाराष्ट्राला लोक लाईव्ह च्या माध्यमातून आशिर्वचन देणार आहेत

शांती पाठ सह शास्त्रोक्त पद्धतीने गणपती अथर्वशीर्ष

महाराष्ट्रातील प्रसिद्ध जळगाव येथील वेद पाठशाळेचे संस्थापक साखरे गुरुजी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. शांती पाठ सह शास्त्रोक्त पद्धतीने गणपती अथर्वशीर्ष एक आवर्तन साखरे गुरुजी सादर करतील. त्याच वेळी सर्व गणेश भक्तांनी आपापल्या घरी अथर्वशीर्ष चे आवर्तन करून सामूहिक आवर्तनात सहभाग घेऊन गणेश आराधना करावी, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे

गणेश वंदना

प्रभाकर कला संगित अकादमीच्या डाॅ. अपर्णा भट कासार यांची शिष्या कु. मृण्मयी कुळकर्णी गणेश वंदना सादर करणार आहे.

प्रमुख अतिथी

या कार्यक्रमास प्रसिद्ध उद्योगपती,व्यापारी, शाकाहार प्रणेते रतनलाल जी बाफना, सिद्धार्थ बाफना, जळगावातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था केशव स्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष भरतजी अमळकर, गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, लोकशाही समूहाच्या मुख्य संपादक शांता ताई वाणी आणि सल्लागार संपादक धो. ज. गुरव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. तर कार्यक्रमाचे संचलन ज्येष्ठ रंगकर्मी नली नाटकाचे एकल कलावंत हर्षल पाटील सर करणार आहेत.

लोकशाही समूहाद्वारे थेट लाईव्ह प्रक्षेपण

हा संपूर्ण कार्यक्रम लोकशाही समूहाच्या यु ट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच सर्व सोशल मिडीयाद्वारे लाईव्हरित्या सर्वांना पाहता येणार आहे.

अभूतपूर्व प्रतिसाद

रतनलाल सी बाफना ज्वेलर्स पुरस्कृत आणि लोकशाही , लोक लाईव्ह च्या वतीने घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रासह विदेशातून देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला एकूण १७१ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला.

स्पर्धेत सहभागी सर्वांच्या घरातील गणपती समोर केलेल्या आरास चा व्हिडिओ लोकलाईव्ह चॅनल वर प्रसारित करण्यात आले आहे.

या अनोख्या स्पर्धेत महाराष्ट्र आणि परदेशातील मराठी कुटुंबातील गणेश मूर्तीचे आणि आरास चे दर्शन गणेश भक्तांनी घेतले.

प्रथमच अशी भव्य अभूतपूर्व स्पर्धा झाली. लोकलाईव्ह चॅनल वर हे सर्व व्हिडिओ कायमस्वरूपी राहणार आहे.सर्व गणेशभक्तांना लोक लाईव्ह च्या चॅनल ला भेट देऊन सर्व गणपती बाप्पा चे दर्शन नेहमीसाठी घेता येणार आहे

नामवंत, विश्व विख्यात कला शिक्षकांद्वारे परीक्षण

राज्यातील तीन वेगवेगळ्या भागातील नामांकित परीक्षक संजय शेलार – कोल्हापूर, सचिन मुसळे-जळगाव, दीपक पाटील – खोपोली, यांनी परीक्षण केले आहे.

प्रत्येक व्हिडीओचे व्ह्यु आणि लाईक्सचे देखील गुणांकन केले गेले आहे.

स्पर्धेत विजेत्या आरास ला पाहिले पाच हजार, दुसरे तीन हजार तर तिसरे दोन हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
तर लोकप्रिय आरास म्हणजे सर्वात जास्त व्ह्यु आणि लाईक्स आणि कॉमेंट्स चे गुणांकन करून पाहिले तीन हजार, दुसरे दोन हजार तर तिसरे एक हजार चे पारितोषिक देऊन 30 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता ऑनलाइन पद्धतीने सन्मानित करण्यात येणार आहे.सहभागी सर्वांनाच ईप्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

तरी स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्यांनी आणि सर्व गणेश भक्तांनी लोकशाही समूहाच्या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित राहून या अभूतपूर्व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी विनंती लोकशाही समूहाच्या वतीने आणि पुरस्कृतकर्ते रतनलाल सी बाफना ज्वेलर्स च्या वतीने करण्यात आली आहे

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लिंक-

यू ट्यूब – https://www.youtube.com/c/LokLive

फेसबूक – https://www.facebook.com/lokshahilive/

वेबसाईट – https://lokshahilive.com/

Leave A Reply

Your email address will not be published.