जिल्ह्यात आज काेराेनाचे नवे १३२ रुग्ण वाढले तर २१८ डिस्चार्ज

0

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज जिल्ह्यात १३२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २१८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच एक रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज १ रूग्णांचा मृत्यू झाला.

दिलासादायक बाब अशी की, मागील गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणार्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात एकुण ५१ हजार ८२९  रूग्ण आढळून आले असून ४८ हजार ५७३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.  जिल्ह्याचा रिकव्हरीचा रेट हा ९३.७२ टक्क्यांपर्यंत आला आहे. आज १ रूग्णांचा मृत्यू झाला. एकुण जिल्ह्यात १२३८ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता २ हजार ०१८ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

जळगाव शहर – ४५, जळगाव ग्रामीण- ५, भुसावळ-३२, अमळनेर-१, चोपडा-६, पाचोरा-१, भडगाव-१, धरणगाव-२, यावल-६, एरंडोल-०, जामनेर-१८, रावेर-६, पारोळा-०, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-१, बोदवड-१, इतर जिल्हा-१ असे एकुण १३२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.