खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चेवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या….

1

मुंबई । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. खड्सेंचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश निश्चितही झाला असल्याचे बोलले जात असून घटनास्थापनच्या मृहुतावर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान,  या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच खडसे यांच्या भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभेतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे याही नाराज होत्या. त्यांनी ती नाराजी अनेकदा जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. एका व्यासपीठावर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्रितपणेही काही जाहीर कार्यक्रमांमधून आपल्या मनातली खदखदही बोलून दाखवली होती. पंकजा मुंडे यांची नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याचं म्हटलं जातं.

त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशावर पंकजा मुंडे काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यावर आज पतिक्रिया देताना पंकजा म्हणाल्या कि, ‘एकनाथ खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत याची मला खात्री आहे. खडसे हे अनुभवी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत’ असंही त्यांनी सांगितलं. ‘खडसे पक्ष सोडतील, असं मला वाटतं नाही. ही फक्त चर्चा आहे. जसा एखादा नेता पक्षात आला तर फायदा होतो, तसाच सोडून गेल्यावर नुकसान होतं,’ असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

1 Comment
  1. Nitin Nalawade says

    खडसे साहेब हे ज्येष्ठ आणि वजनदार नेते आहेत हे सर्वश्रुत आहे पण भारतीय जनता पार्टी ने खडसे साहेबाना आतापर्यंत बाजूला का केले होते?आता खडसे साहेब पक्षांतर्गत करत आहेत म्हणुन भाजपचे नेते आता आपुलकी दाखवण्याचे प्रयत्न करत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.