भुसावळात विद्युत शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील खडका चौफुलीजवळील मुस्कान रुग्णालयावर लागलेले जाहिरातीचे बॅनर काढताना विद्युत तारांना स्पर्श होवून शॉक लागल्याने 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आवेश अकिल खान (23, बत्तीस खोली, रॉकेल डेपोजवळ, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात डॉ.तौसीफ खान यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास मिलिंद कंक व संदीप निकम करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.