साकळी येथील भाजपाचे काही ‘निष्टावन’ कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर?

0

या पक्षप्रवेश काही पदाधिकारी व  कार्यकर्त्यांचा समावेश

साकाळी ता.यावल (प्रतिनिधी):  राज्याचे माजी महसूल मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे हे ‘ घटस्थापने ‘च्या शुभमुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असतांना  जिल्ह्यातील भाजप मध्ये सुध्दा मोठी पडझड अशीही चर्चा सर्वत्र रंगू लागल्या असतांना साकळी येथील  भाजपाच्या फळीतही मोठी पडझड होणार असल्याच्या चर्चा गावात सर्वत्र चौका-चौकात रंगत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून साकळी गाव हे संघ  -भाजपचे एक मोठे ‘शक्तीकेंद्र’ म्हणून जिल्हाभरात ओळखले जाते. या पक्षाच्या माध्यमातून गावात अनेक छोटे-मोठे कार्यकर्ते निर्माण झाले. पक्षाच्या माध्यमातून त्यांना पक्षाच्या व इतर काही मोठयापदांच्या जबाबदाऱ्याही वेळोवेळी मिळाल्या. यातून गावात पक्षाची एक वेगळी ‘ ताकद ‘ही अलीकडच्या काळात निर्माण झाली आहे . पक्षाच्या माध्यमातून अनेक छोट्या-मोठ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सुद्धा स्थानिक पातळीवर पदे मिळाली. गावाच्या काही संस्थाही भाजपच्या ताब्यात आल्याने  गेल्या किमान १० ते १२ वर्षांपासून भाजपची गावाच्या स्थानिक पातळीवर ‘मजबुत’ अशी पकड निर्माण झाली आहे. एकूणच गावाच्या स्थानिक राजकारणात भाजपचा सध्या दबदबा असल्याचे दिसून येतं आहे. दरम्यानच्या काळात नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सुरू असल्याने गावातील काही ‘ नाराज ‘ व ‘ निष्ठावान ‘ कार्यकर्त्यांनी ‘आम्ही नाथाभाऊंच्याच मागे आहोत !’ असा नारा देत नाथाभाऊं सोबत भविष्यातील राष्ट्रवादीची वाट धरण्याच्या मानसिकतेत आहेत.अशी गावात एक मोठी राजकिय चर्चा निर्माण झाली आहे.  अलीकडच्या काळात जे भाजपचे जे एकनिष्ठ कार्यकर्ते होते त्यांचे पद व इतर काही कारणास्तव पक्षात काही जमले नाहीत. त्यामुळे दुखावलेल्या कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण झाली आहे. व ही दुखावलेली कार्यकर्त्यांची फळी राष्ट्रवादीत  जाण्याच्या मार्गावर असल्याची गावातील कट्या-कट्ट्यावर चर्चा आहे.

विविध संस्थानंच्या माध्यमातून भाजपाची सध्या  गावावर एकहाती सत्ता आहे. आणि जर का नाथाभाऊंन सोबत जर उद्या हे दुखावलेले निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते जर राष्ट्रवादीत जाणार असतील तर गावाच्या राजकारणात ही मोठी ‘ दुफळी ‘ होणार हे मात्र निश्चित आहे. तेव्हा  या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये कोणकोण आहे ? तसे काही पक्ष प्रवेशाचे खलबते सुरू आहेत का ? नाथाभाऊंकडूनही पक्ष प्रवेशासंबंधी काही मॅसेज आला आहे का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने गावात चर्चिले जात आहे व तशी नागरिकांमध्ये ही उत्सुकता निर्माण झाली आहे. तेव्हा आता उद्या काय होते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.