मोझरी येथे वाहतूक पोलिसांनी पकडला गोवंशाची वाहतूक करणारा ट्रक

0

अमरावती (प्रतिनिधी) : नागपुर वरून अमरावती कडे कत्तली च्या उद्देशाने नेण्यात येणार्‍या ट्रकमधून तीस गोवंशाची तिवसा पोलीस स्टेशनच्या वाहतूक शिपायांनी सुटका केली. आज 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास गोवंशाची वाहतूक करणारा ट्रक गुरुकुंज मोझरी येथे पकडण्यात येऊन कारवाई करण्यात आली.

गेल्या काही दिवसापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरून गोवंशांना कत्तली च्या या उद्देशाने निर्दय पणे वाहनांमध्ये कोंबून  वाहतूक केल्या जात आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मालवाहू ट्रक वर ताडपत्री झाकून जनावरांची तस्करी होत असल्याचे सकाळी गुप्त माहितीवरून तिवसा पोलिस स्टेशनचे वाहतूक शिपाई सतीश चंदन व विशाल सूर्यवंशी यांनी (mh40 बी एल 49 89) या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकला तिवसा ते मोझरी पर्यंत पाठलाग करून पकडण्यात आले. त्यामध्ये एकूण 31 गोवंश आढळून आले असून त्यापैकी एका गोवंशाचा गुदमरून मृत्यू झाला. सुटका केलेली 30 जनावरे गोरक्षण संस्थेकडे सोपविण्यात आली . ट्रक  मधील एकाला अटक करण्यात आली असून. सदर कारवाई तिवसा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक रिता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येऊन . गोहत्या बंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले  असून पुढील तपास तिवसा पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.