मंत्री बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेसच्या शेतकरी बचाओ व्हर्चुअल रॅली’चा लाखो लोकांनी घेतला लाभ

0

खामगांव:– लोकशाही, संविधान व संसदेचे नियम पायदळी तुडवून केंद्रातील मोदी सरकारने षेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे लागू केले आहे. नवीन कायद्यामुळे षेतकरी, कामगार उद्ध्वस्त होणार असून त्यांना उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. हे काळे कायदे रदद् करण्यात यावे या मागणीसाठी काॅंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्षनाखाली, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देषव्यापी लढाई सुरु केली आहे.मोदी सरकारने लागू केलेले शेतकरी व कामगार  विरोधी काळे कायदे रदद् करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन सुरु असून 15 आॅक्टोंबर 2020 रोजी ‘शेतकरी बचाओ’ रॅलीची व्हर्चुअल  सभा आयोजित करण्यात आली होती.या रॅलीला महाराष्टतुन लाखो लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

महाराष्टतील संगमनेर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर,अमरावती, पालघर या  सहा विविध ठिकाणाहून काॅंग्रेसच्या प्रमुख नेते एकमेकांषी इंटरकनेक्ट झाले होते. या अभिनव व्हर्चुअल रॅलीला काॅंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी, महाराष्टाचे प्रभारी एच.के.पाटील, खासदार राजीवजी सातव, प्रदेषाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,वैद्यकीय षिक्षण मंत्री अमित देषमुख, महिला बालकल्याण मंत्री यषोमतीताई ठाकुर यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मार्गदर्षन केले. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परंतू केंद्रातील शेतकरी विरोधी मोदी  सरकार हे उद्योगपती मित्रांना फायदा पोहचविण्यासाठी शेतकरी विरोधी बिल कायदा लागू केला आहे. या कायद्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. खोटे बोलुन मोदी सरकारने देषवासीयांची दिषाभूल करुन देष विकायला काढला आहे. जो पर्यंत मोदी सरकार हे शेतकरी विरोधी काळे कायदे रदद् करत नाही तो पर्यंत काॅंग्रेसचा संघर्श सुरु राहील असे या नेत्यांनी सांगितले.राज्यातील 10 हजारपेक्षा जास्त गावांमध्ये एलईडी स्क्रीन, एलसीडी प्रोजेक्टर, डिजीटल टीव्ही, लॅपटाॅप, संगणक तसेच फेसबुक, व्टिटर, युटयुबच्या माध्यमातून या शेतकरी बचाओ मेळाव्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.या व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून 50 लाख षेतक-यांषी संवाद साधण्यात आला.

खामगांव मतदार संघात माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विरोधी 3 काळे कायदे रदद् करण्याच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्हर्चुअल रॅलीचा हजारो नागरिकांना लाभ घेतला. ही व्हर्चुअल रॅली पाहण्याकरीता खामगांव मतदार संघातील 15 गावात एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. तसेच मतदार संघातील प्रमुख कार्यकत्र्यांच्या वाडयात व मुख्य ठिकाणी एलईडी प्रोजेक्टर व डिजीटल टीव्हीच्या माध्यमातून तसेच महाराणा केबल नेटवर्कच्या  माध्यमातून सुध्दा मतदार संघातील जवळपास 10 हजार नागरीक या व्हर्चुअल रॅलीषी जोडल्या गेले होते. गांधी चैक येथील काॅंग्रेस पक्ष कार्यालयात महिला काॅंग्रेसच्या पदाधिका-यांनी  सहभाग घेउन रॅलीचे लाईव्ह प्रक्षेपण पाहिले. तसेच नांदुरा रोडवरील संत तुकाराम महाराज सभागृह येथे ही व्हर्चुअल रॅली पाहण्यासाठी भव्य एलईडी प्रोजेक्टर लावण्यात आले होते. माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहुन प्रमुख नेत्यांचे मार्गदर्षन एैकले.

कोरोना काळात प्रदेषाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांनी अतिषय चांगले नियोजन करुन अभिनव अष्या षेतकरी बचाओ रॅलीचे यषस्वी आयोजन करुन काळया कायद्या विरोधात जनजागृती केल्याबदद्ल माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी  प्रदेषाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला. 2 कोटी षेतक-यांच्या स्वाक्षरी मोहिमेमध्ये खामगांव मतदार संघातील प्रत्येक गावात बुथनिहाय नियोजन करुन जास्तीत जास्त शेतकरी व कामगार बांधव यांच्या स्वाक्षरीचे निवेदन तयार करुन प्रदेश काॅंग्रेस कमिटीला पाठविले जाईल असे सानंदा यांनी सांगितले. यावेळी नरेंद्र मोदी-किसान विरोधी, नरेंद्र मोदी-कामगार विरोधी, भाजप हटाओ-देष बचावो, भाजप हटावो-लोकतंत्र बचाओ, भारतीय राष्टीय काॅंग्रेस पक्षाचा विजय असो, सोनियाजी गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, राहुलजी गांधी तुम आगे हम तुम्हारे साथ है, अश्या गगनभेदी घोशणांनी परिसर दणाणून गेला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.