धरणगावात वाळू माफियांविरुद्ध कोंबिंग ऑपरेशन ; महसूल, पोलीस आणि आरटीओची संयुक्त मोहीम –

0

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तहसीलदारांना वाळूमाफियांकडून झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने वाळू माफियांविरुद्ध कोंबिंग ऑपरेशन सुरु आहे. त्यानुसार आज महसूल, पोलीस आणि आरटीओ विभागाच्या संयुक्त पथकाने बांभोरी प्र.चा येथे पाहणी करून विना क्रमांक असलेले ट्रॅक्टर धारकांना नोटीस देण्यात आली. तर आव्हानी गावातून नदीपात्रात जाणारे रस्ते खोदून काढण्यात आले आहेत.

धरणगाव तहसीलदारांची गाडीला घेरत वाळूमाफियांनी त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मध्यरात्री चैताली जिनिंगजवळ बुधवारी मध्यरात्री घडली होती. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अवैध वाळू वाहतुकीवर सक्त कारवाईच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार महसूल, उपप्रादेशिक परिवहन तसेच पोलीस हे तिघंही विभाग एकवटले असून अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर संयुक्तपणे कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी एरंडोल प्रांतअधिकारी विनय गोसावी, धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे, निवासी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते व परिवहन अधिकारी यांनी नदीपात्रात जावून पाहणी केली. यादरम्यान रस्ते बंद करण्यात आले असून विना नंबर ट्रॅक्टरची तपासणी केली जात आहे. दरम्यान, काही वर्षांपासून वाळू माफियांनी धरणगाव तालुक्यात हैदोस घातलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.