गणित आणि विज्ञान विषयांची ऑनलाईन कार्यशाळा सुरू

0

सातारा | प्रतिनिधी 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे) यांच्यातर्फे विद्यार्थी आणि शिक्षकांच्यासाठी ‘मैत्री करूया विज्ञान – गणित’ अशी ही दहा भागांची ऑनलाईन कार्यशाळेची मालिका सुरू करण्यात आलेली आहे. दि. ३ ते १२ ऑक्‍टोबर दरम्यान होणाऱ्या कार्यशाळेत घरच्या घरी उपलब्ध साहित्यातून गणित आणि विज्ञानाच्या प्रतिकृती तयार करण्याचे प्रयोगांची प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या हस्ते दि. ३ ऑक्टोबर रोजी या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, आईसर पुण्याच्या संशोधने विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. संजीव गलांडे, डॉ. हरीनाथ चक्रपाणी, डॉ. सौरभ दुबे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील, उपसंचालक विकास गरड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेमध्ये उष्णतेच्या गमतीजमती, चुंबकाचे गुणधर्म आणि उपयोग, चुंबकत्व आणि विद्युतधारा यांचा परस्परसंबंध, खेळ प्रकाशाचा, ध्वनि : निर्मिती आणि गुणधर्म बल आणि दाब, आम्ल, आम्लारी आणि क्षार, रासायनिक अभिक्रिया आणि त्यांचे प्रकार, मानवी शरीर, परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ अशा विषयांची प्रत्यक्ष प्रयोगातून माहिती दिली जाणार आहे. https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCenter या लिंकवर ही कार्यशाळा पाहता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.