पारोळा युवा परिषदेतर्फे गुणवंतांचा सन्मान

0

पारोळा | प्रतिनिधी

कोरोनाच्या संक्रमनामूळे यंदा दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सार्वजनिक स्वरुपात झाला नाही; मात्र जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या माध्यमातुन पारोळा तालूका भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेने मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेत तालूक्यात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या १३ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढुन पुढिल काळात चांगले यश मिळण्याची उर्जा मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात शहिद भगतसिंग व सरस्वती माता यांच्या प्रतिमेच पूजन व माल्यार्पण करून झाली, तालूकाध्यक्ष कुंदन पाटील यांनी प्रास्ताविक करुन यूवा परिषदेच्या माध्यमातून भविष्यात होणा- या उपक्रमांविषयी माहिती दिली,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे राज्य उपाध्यक्ष कमलेश सोनवणे होते, त्यांनी, ध्येयवेडे माणसंच इतिहास घडवतात आणि शहाणी माणसं तो इतिहास वाचतात, आता तुम्हाला इतिहास घडवणारं व्हायचंय की इतिहास वाचणार हे तुम्ही ठरवा व भविष्यात योग्य दिशेने मार्गक्रमण करा, असे सांगितले.

प्रमूख पाहुणे म्हणून युवा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिवाजी बाविस्कर, मराठा सेवा संघाचे संदीप पाटील, डॉ.निलेश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालूकाध्यक्ष योगेश रोकडे आदी उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतूक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, उपस्थित मान्यवरांनी दहावीत यश संपादन केलेल्या रविंद्र पाटील, हर्षल नावस्कर, भावेश पाटील, अभय सैंदाणे, दिव्या सुर्यवंशी, प्रतिक शिंदे, अजित थोरात, अजय महाजन, राजश्री शिंदे, ओम थोरात, मैथिली पाटील, सिध्दार्थ जगताप, जिज्ञासा पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, शालेय साहित्य व गुलाबपुष्प देऊन गौरव केला, तसेच पारोळा येथील कांताई क्लिनिकचे संचालक डॉ.निलेश पाटील यांनी कोरोना काळात शहरासह तालूक्यातील रुग्णांना उत्तम सेवा देऊन सेवाभाव जपला आहे, या कार्या प्रित्यर्थ डॉ.पाटील यांचा कोरोना योध्दा म्हणुन पारोळा युवा परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला, कार्यक्रम यशस्वितेसाठी तालूकाध्यक्ष कुंदन पाटील, तालुका उपाध्यक्ष अक्षय निकम, तालूका महासचिव प्रशांत पाटील, तालूका सचिव भारत पाटील, उमेश पाटील, लोकेश पवार, समाधान मगर, तालूका कोषाध्यक्ष सनी निकम, तालूका समन्वयक हेमंत निकम, शुभम पाटील, प्रमोद सुर्यवंशी, अजय बोरसे या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव लोकेश पवार यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.