भडगावात शेतीचे वादळी पावसाने नुकसान, पिकांची पंचनामे करून नुकसानभरपाई द्या

0

या मागणी साठी शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

भडगाव:- प्रतिनिधी

नाचणखेडा रस्ता बाळद शिवारातील शेतकऱ्यांनी आज संतप्त होऊन शेतीचे तात्काळ पंचनामे करावे व नुकसान भरपाई मिळावी. या मागणीसाठी आज तहसीलदार माधुरी आंधळे व आमदार किशोर पाटील यांना निवेदन दिले.  
यावेळी शेतकरी नरेंद्र पाटील, शेख शकील शेख बाबू सुभाष ठाकरे, रमेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शब्बीर बेग मिर्झा, नंदू चौधरी , आत्माराम महाजन, श्याम चौधरी, राजेंद्र चौधरी, वसंत पाटील, नामदेव महाजन, शांताराम माळी, अनिल पाटील, नामदेव महाजन,  विनोद आचारी, अहमद मिर्झा, धोंडू सुका पाटील, काशिनाथ आचारी आदी शेतकरी उपस्थित होते. 
गेल्या आठवडाभरापासून सातत्याने होणाऱ्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे .  काढणीला आलेले पीक जमीनदोस्त झाले असून शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास वादळी पावसाने हिरावून घेतला आहे.  पीक जमीनदोस्त होत आहे . मका,चवळी, ज्वारी, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, लिंबू पिके मातीमोल झाली आहे. शेतकऱ्यांना पीक सोडावे लागत आहे. त्यामुळे शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नाचणखेडा रस्ता बाळद खु। शिवारातील शेतकऱ्यांनी आज २८ रोजी दुपारी 1 वाजता तहसीलदार माधुरी आंधळे व आमदार किशोर पाटील यांच्याकडे निवेदनाने केली .  
अनेक पीक पाण्यात आहेत, जमीन अद्याप ओल्या आहेत, पीक सडत आहे.  शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी ,  शेतकऱ्यांचे हे गंभीर प्रश्न तात्काळ सोडवावे अशी मागणी यावेळी केली भेटीदरम्यान तहसीलदार माधुरी आंधळे यांनी तलाठ्यांना लवकरच पंचनामे करा असे सांगितले असून ते पंचनामे करणार असल्याचे सांगितले. तर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी ही शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेतल्या . 

Leave A Reply

Your email address will not be published.