लाच मागणी भोवली ; चाळीसगाव तहसीलच्या लिपिकासह खाजगी पंटरला अटक

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) ; शेतजमिनीच्या उतार्‍यावरील वारसाचे नाव कमी करण्याच्या मोबदल्यात ११ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे प्रकरण चाळीसगाव तहसील कार्यालयाच्या लिपिक टंकलेखकाच्या अंगलट आले असुन खाजगी पंटरासह दोघांना जळगाव ए.सी.बी.च्या पथकाने दि. २५ रोजी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. प्रशांत किसन सावकारे वय – ३०  रा. पाचोरा तसेच खाजगी इसम यादव केशव पवार वय – ६० रा. भोजे, ता.पाचोरा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,पाचोरा तालुक्यातील ४८ वर्षीय तक्रारदाराने त्यांच्या बहिणीच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या उतार्‍यावरील वारसाचे नाव कमी करण्यासाठी प्रकरण दाखल केल्यानंतर काम करण्याच्या मोबदल्यात यातील आरोपी प्रशांत सावकारे व यादव केशव पवार यांनी १७ जुलै २०२० पंचांसमक्ष ११ हजार रुपयांची लाच मागितली होती. तेव्हा आरोपी पाचोर्‍यात नोकरीस होता मात्र कालांतराने त्याची चाळीसगाव तहसिलला बदली झाली. मात्र लाच मागणीबाबतचा अहवाल जळगाव ए.सी.बी. ला प्राप्त झाल्याने दि. २५ रोजी शुक्रवारी एका आरोपीला चाळीसगावातून तर दुसर्‍याला पाचोरा येथून अटक करण्यात आली. सदरची कारवाई जळगाव ए.सी.बी.चे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकुर, निरीक्षक निलेश लोधी, सहाय्यक फौजदार रविंद्र माळी, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार सुरेश पाटील, नाईक सुनील शिरसाठ, नाईक मनोज जोशी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर या पथकाने केली. या प्रकारामुळे महसुल विभागाची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.