म्हसावद येथील स्वा.सै.पं ध.थेपडे विद्यालयात ऑनलाइन शिबीर संपन्न

0

म्हसावद, ता. जळगाव : येथील स्वा.सै.पं ध.थेपडे उच्च माध्यमिक विद्यालयात दि. २२ व २३ सप्टेंबर २०२० मंगळवार व बुधवार ह्या दोन दिवसांचे लेखिका आपल्या भेटीला ऑनलाइन शिबीर आयोजित करण्यात आले होते; पहिल्या दिवशी  इ.१२वी युवकभारती मराठी पाठ्य पुस्तकातील धडा वीरांना सलामी  च्या प्रसिद्ध लेखिका सौ. अनुराधा प्रभुदेसाई यांनी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्या निमित्ताने सीमेवरील सैनिकांची शौर्यगाथा मांडली व सैनिकांबद्दलचा आदरभाव  व्यक्त करतांना जय हिंद चा नारा दिला. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात कथा प्रकार गढी च्या प्रसिद्ध लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांनी शिक्षकातला चांगुलपणा, खेड्यातील शेतकरी, मानुसकी, आदर्श गावची संकल्पना  यांचे वर्णन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर या परिसंवादातून  केले.

 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.निलेश पवार सर,लेखिका परिचय क्रमशः प्रा.योगराज चिंचोरे सर व प्रा. पराग पाटील सर यांनी केले तसेच महाविद्यालया द्वारे आभार प्रा. समाधान साळुंखे सर, यांनी मानले.

तर कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री.पी.डी.पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री. डी. एस. खोडपे सर, जेष्ठ शिक्षक श्री.आर.व्ही.पाटील सर, कला शिक्षक श्री. पिंगळे सर, श्री.भंगाळे सर, श्री. बच्छाव सर, श्री. संजय पवार सर यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.चव्हाण मँडम, प्रा.मगरे सर, प्रा.अमोल चौधरी सर, प्रा.सर्जेराव निकम सर, प्रा.श्रुती पाटील मँडम यांनी मेहनत घेतली.

कार्यक्रमाला थेपडे ज्यू.कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लेखिकांशी ऑनलाइन संवाद साधला व अशी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.