शेतकरी संघटनांचा आज ‘भारत बंद’

0

नाशिक: नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी आज (दि.२५) रोजी ‘ भारत बंद ‘ची हाक दिली आहे. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

दरम्यान, विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. या संघटनाही बंदमध्ये सहभागी होतील.

अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी याबाबत माहिती दिली. केंद्राने बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना हमीभाव नाकारणारी, बाजार समित्यांचे अस्तित्व पुसणारी व शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारी प्रक्रिया पुढे रेटली आहे. केंद्राची ही भूमिका शेती, माती व शेतकऱ्यांशी द्रोह करणारी आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा सभेच्या वतीने धिक्कार करीत किसान सभा व २०८ शेतकरी संघटनांच्या देशव्यापी मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने या कायद्यांविरोधात २५ सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.