अमळनेरातील फायनल प्लॉट ७७,७८ च्या संकुलाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

0

अमळनेर (प्रतिनिधी):-शहरातील फायनल प्लॉट नं. 77,78 चे जागेत दुकान संकुल बांधकाम करणे बाबत कामाचे आदेश वशि -13/316 दिनांक 07/09/2020 अन्वये देण्यात आलेले असून. सदर जागेवर तळमजला व पहिलामजल्यावरील असे एकूण 25 दुकानाचे बांधकाम होणार असून व त्या बांधकामासाठी अंदाजित रक्कम रुपये -98,87,898/- येणार आहे. तरी सदर दुकान बांधकामांचा दि.24/09/2020 रोजी भुमीपुजन सोहळा माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या शुभहस्ते पार पाडलेला आहे. सदर भुमीपुजन सोहळा नगरसेवक राजु संदानशिव, प्रताप शिंपी, भुत बापु, विक्रांत पाटील, शेखा हाजी, फयाज दादा, बाबु सांळुखे, शितल देशमुख, नदीम शेख, जीवन पवार, अभियंता संजय पाटील, राधेश्याम अग्रवाल यांच्या उपस्थित पार पडलेला आहे. सदर प्रश्न हा नगरपरिषदेकडे हा सन – 2015 पासून प्रलंबित होता. पर्यायीने नगरपरिषदेचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान होत होते. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी सदर प्रश्नी लक्ष घालुन हा प्रश्न मार्गी लावला व हया कामाचे आदेश मा.मुख्याधिकारी यांनी तातडीने लक्ष घालुन दिलेले आहेत.

त्यामुळे नगरपरिषदेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार असून सदर 25 दुकान संकुलांचा उपयोग 25 कुटुंबांचे उपजीवीकेचे साधन म्हणून होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.