जिल्हाधिकारी एस.राममुर्ती यांचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले स्वागत

0

खामगांव (प्रतिनिधी)  बुलडाणा जिल्हयाचे जिल्हाधिकारी म्हणून एस.राममुर्ती हे नुकतेच रुजू झाले आहे. दि.22 सप्टेंबर 2020 रोजी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाउ उमाळकर यांनी बुलडाणा येथे जावुन नवीन जिल्हाधिकारी श्री.एस.राममुर्ती यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी महोदयांशी चर्चा करतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सांगितले की, कोरोना काळात खामगांव शहर व परिसराच्या स्वच्छतेकडे नगर पालीका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.पालीकेने कचरा उचलण्यासाठी घंटागाडयांना कोटयावधी रुपयांचा कंत्राट दिल्यानंतर देखील शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्यावर मोकाट गुरेढोरे फिरत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. कंटेनमेंट झोनमध्ये दुकान लावण्यास मनाई असतांना भाजीपाला दुकानदार त्या ठिकाणी खुलेआम दुकाने लावुन नियम मोडत आहे. शहरात अनेक ठिकाणी सोशल डिस्टसिंग पाळले जात नाही. दिलेल्या वेळेनंतरही अनेक व्यावसायीक आपली दुकाने उघडी ठेवतात. त्याविरुध्द महसुल व पालीका प्रशासन कारवाई करत नाही. तसेच महसुल विभागाच्या अर्थपुर्ण दुर्लक्षामुळे खामगांव व शेगांव तालुक्यात अवैध रेतीचे उत्खनन होत असुन त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडत आहे असे सानंदा यांनी सांगितले तसेच खामगांव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आॅक्सीजन व औषधांचा तुटवडा आहे. अतिवृष्टीमुळे जिल्हयातील लाखो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकÚयांना शासनाकडून मदत मिळवुन देण्यासाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचा तात्काळ सव्र्हे करण्याचा महसुल प्रशासनाला सुचना देवुन त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा अशी विनंती राणा दिलीपकुमार सानंदा यांनी जिल्हाधिकारी एस.राममुर्ती यांच्याकडे केली. यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व बाबींकडे लक्ष घालुन आवश्यक ती योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक पंजाबराव दादा देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशसिंह तोमर,खामगांव शहर अल्पसंख्यांक सेलचे बबलु पठाण, बुलडाणा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस तुषार चंदेल यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.