बॉलिवूड ड्रग्स रॅकेटवर उज्ज्वल निकमांनी उपस्थित केला प्रश्न…म्हणाले

1

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांचे नावे पुढे आली आहेत. एजन्सी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी)ने दीपिका, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान, रकुल प्रीत सिंग, नम्रता शिरोडकर यांना एनसीबीने समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. हा बॉलिवूडसाठी एक मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.दरम्यान, याबाबत वरिष्ठ वकील अॅड. उज्जल निकम यांनी प्रश्न उपस्थित केला आहेत.

ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील हिरोचे नावही समोर येणार आहे. आतापर्यंत केवळ अभिनेत्रींचे नाव समोर आले आहेत. एनसीबी या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने चौकशी करीत आहेत. अशा परिस्थितीत हा मुद्दा पब्लिसिटी स्टंट म्हणून राहू नये, परंतु प्रत्येकाचे वास्तव समोर आले पाहिजे. हॅसीस, गांजा आणि या सर्व गोष्टी कोठून आल्या आहेत, त्याचा तपास केला पाहिजे, असं उज्जल निकम म्हणाले.

बॉलिवूड गॅगवर बोलताना ते म्हणाले की, “दुबई बसलेल्या भाईच्या मदतीने काही बॉलिवूड लोक आपली स्थिती बनवायचे. बॉलिवूडमधील लोक विचार करू लागले की कोणीही आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही.” ड्रग्ज प्रकरणाबद्दल बोलताना एनसीबीने आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात एकूण 18 लोकांना अटक केली आहे. या प्रकरणात बरीच मोठी नावेही समोर आली आहेत. यामध्ये दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, नम्रता शिरोडकर अशी नावे आहेत. एनसीबीने या सर्व लोकांना बोलावून चौकशीसाठी बोलावले आहे. एनसीबी चौकशीत रियाने सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांची नावे घेतली.

 

1 Comment
  1. Ravindra.S. Manohsr says

    Advocate aani judges va judiciary law systems hi fkta advocates va judges va judiciary related judiciary law systems employees va states governments va central governments va police department va home department LA changlya prakarey thavuk ahey aani arrest warrants aso nahi tar court summons eka divsat advocates va judges va judiciary employees cancelled karun dakhvtat jyala kamit kami 6 months lagtatach kyonki ruppiya bolta hai

Leave A Reply

Your email address will not be published.