सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

0

नवी दिल्ली : सोन्याच्या किंमती सलग तिसऱ्या दिवशी कमी झाल्या आहेत. अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या तेजीमुळे विदेशी बाजारात  सोन्याचे दर 2 टक्क्यांनी कमी होऊन 1862 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. दरम्यान देशांतर्गत बाजारात सोने गेल्या महिन्यातील सर्वोच्च स्तरापेक्षा 6000 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहे.

गेल्या महिन्यात सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. या रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्यानंतर आतापर्यंत जवळपास 6000 रुपयाांनी सोने उतरले आहे. 7 ऑगस्ट रोजी एमसीएक्सवर सोन्याचे दर 56,000 रुपये प्रति तोळापेक्षाही अधिक होते. तर सराफा बाजारात सोन्याचे भाव 56,200 प्रति तोळावर पोहोचले होते. आता सोन्याचे दर 51 हजार प्रति तोळाच्या आसपास आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.