बजेट मध्ये तरतूद १४ लाखांची ; सभापती टालेंनी खर्च केला ५१ लाख रुपयांचा

0

भ्रष्टाचार करणायांवर फौजदारी कारवाई होणार

 खामगांव (प्रतिनिधी) :  खामगांव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भेटी समारंभ या शिर्षकाखाली १४ लाख रुपयांची वार्षिक तरतुद केली आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला शेतमाल विक्रीसाठी आणणाया शेतकयांकडून नाममात्र १ रुपये नोंदणी फी म्हणून वरण, भात, भाजी पोळीचे जेवण संबंधीत अडत्याच्या कडून कुपन मिळाल्यानंतर दिल्या जाते. भेटी समारंभ या शिर्षकाखाली वार्षिक बजेट मध्ये केवळ १४ लक्ष रुपयांची मान्यता असतांना भ्रष्टाचारी सभापतींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या आकाश पुंâडकर यांच्या मार्गदर्शनात बाजार समितीचे तत्कालीन सभापती, सचिव व सर्व संबंधितांनी कोणत्याही ठरावाची मान्यता न घेता प्रधान सचिव (पणन) यांच्या पत्राचा खोटा आधार घेऊन, संगनमत करुन षडयंत्र रचून व खोटे दस्तावेज तयार करुन मागील ६ महिन्याच्या कालावधीत भेटी समारंभ या शिर्षकाखाली भोजन पाकीट वाटपासाठी १५ लक्ष व धान्य किट वाटपासाठी ३६ लक्ष असा एकुण ५१ लक्ष रुपये खर्च केला आहे. शेतकरी संस्थेची आर्थिक लुट करणायांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करावी अशी मागणी तत्कालीन संचालक श्रीकृष्ण टिकार, तुषार चंदेल सह तक्रार कत्र्यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती संतोष टाले व सचिव यांनी केलेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, बाजार समितीचे तत्कालीन संचालक श्रीकृष्ण टिकार यांच्यासह ५ संचालकांनी मा. जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीची दखल घेत मा. जिल्हा उपनिबंंधक यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत कृषी उत्पन्न पणन अधिनियम (विकास व विनिमयन) १९६३ चे कलम ४० ब नुसार चौकशी करण्याचे आदेश देऊन श्री कोल्हे सहा. निबंधक सहकारी संस्था शेगांव यांची चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्ती करुन प्रकरणी ४५ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दि. २०.७.२०२० रोजी दिले होते. त्या अनुषंगाने मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०२० रोजी चौकशी अधिकारी श्री कोल्हे यांनी तक्रारीशी संबंधीत सर्वांना आपला लेखी जबाब सादर करण्याचे आदेश दिले होते. खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात चौकशी अधिकारी श्री कोल्हे यांनी याप्रकरणी सर्व संबंधितांचे म्हणणे जाणुन घेतले. तक्रारदार माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, तुषार चंदेल, बाजार समितीचे माजी संचालक श्रीकृष्ण टिकार, संजय झुनझुनवाला, विवेक मोहता, राजेश हेलोडे यांनी झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आपला लेखी जबाब व त्यासंबंधीचे पुराव्यासह सर्व कागदपत्रे चौकशी अधिकारी यांच्याकडे सुपुर्द केली.

यावेळी बाजार समितीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या भोजन पाकीट वाटपामध्ये झालेला १५ लाखाचा भ्रष्टाचार तक्रारकत्र्यांनी चौकशी अधिकारी यांच्या निदर्शनास आणुन दिला. कोविड-१९ च्या काळात प्रधान सचिव पणन यांच्या पत्राचा दुरुपयोग करुन सभापती संतोष टाले व सचिव मुगुटराव भिसे व ठरावाच्या बाजूने असणाया संचालकांनी संगनमताने बनावट दस्तवेज तयार करुन कुठल्याही सभेची व सक्षम अधिकाNयाची मान्यता न घेता, कोणतीही ई-निविदा पूर्ण न करता बाजार समितीच्या शिदोरी गृहात भोजन पाकीट वाटप सुरु केले. ३ लाखावरील खर्चाला ई-निविदा मागविणे आवश्यक असतांना या कामासाठी निविदा बोलाविण्यात आल्या नाहीत. बाजार समितीच्या वतीने शेतमाल विक्रीसाठी आणणाया शेतकयांसाठी नाममात्र १ रुपयात जेवण देण्याची योजना अनेक वर्षापासुन सुरु असून यासाठी श्रीकांत देशमुख यांच्याकडून करारनामा करुन त्यांना कत्राट देण्यात आले होते. संबंधित कत्राटदार यांचा नियमित बाजार समितीचे शिदोरीगृहाचा वंâत्राट ४ वर्षापासुन संपुष्टात आला असुन याबाबत ई-निविदा न बोलाविता षडयंत्र रचून बाजार समितीने शिदोरी गृहाच्या त्याच कत्राटदाराला भोजन पाकीट बनविण्याचे काम दिले. बाजार समितीतर्पेâ दिल्या जाणाया भोजन पाकिटामध्ये फक्त २ पोळी व पाकीट अश्या स्वरुपाचे भोजन पाकीट तयार केल्या जात होते. वास्तविक १० ते १२ रुपयात २ पोळी व भाजी असे दर्जेदार जेवण मिळु शकत असतांना बाजार समितीने त्यासाठी कत्राटदाराला २० रुपये ५० पैसे इतका दर आकारल्या जात होते. सदर भोजन पाकिटावर आमदार आकाश फुडकर यांचा फोटो व कमळाचे निशाण असलेले स्टिकर लावुन भोजन पाकीट वाटण्यात आले. पैसा शेतकNयांचा व फोटो आकाश पुंâडकरांचा व त्यातही १५ लक्ष रुपयांचा भ्रष्टाचार हा निंदनिय प्रकार यामध्ये करण्यात आला होता.

या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून दररोज हजार पाकिट तयार होत असतांना रजिस्टर मध्ये ४ हजार पाकिटे तयार केल्याच्या खोट्या नोंदी घेण्यात आल्या. ते भोजन पाकीट कोणाच्या हस्ते व कोठे वाटप करण्यात आले व कोणत्या गरजुंना वाटप करण्यात आले याबाबत बाजार समितीकडे कुठलीही नोंद नाही. बाजार समितीने ई-निविदा न काढताच भोजन पाकीट वाटपासाठी कत्राटदार श्रीकांत देशमुख यांना १३ लक्ष ८८ हजार ९५६ रुपये व त्या देयकावरील जीएसटी म्हणुन ६९ हजार ४४८ रुपये तसेच भोजन पाकीट वाटपासाठी अ‍ॅटो भाडा बिल म्हणुन ३२ हजार रुपये व स्टिकर तयार करण्यासाठी ३९ हजार रुपये व स्टिकर छपाई साठी २४ हजार ७८० रुपये असा एकुण १५ लक्ष ५४ हजार ७०९ रुपयांचा बेकायदेशीर खर्च केलेला आहे. सभापती सचिव व सर्व संबंधितांनी भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने संगनमत करुन खोटे दस्तवेज तयार करुन भोजन पाकीट वाटपामध्ये लाखो रुपयांचा अपहार केला आहे म्हणून यासंबंधीचे सर्व रेकॉर्ड तपासण्यात यावे तसेच नियमबाह्य व बेकायदेशीररित्या भोजन पाकीट वाटप करुन बाजार समितीचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल सभापती सचिव व ठरावाच्या बाजूने असलेल्या सर्व संबंधीतांविरुध्द चौकशी अंती भ्रष्टाचार सिध्द झाल्यास त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६, ४०८, ४२०, ४६५, ४६८, ४७७ (अ) १२० (ब) व ३४ सह इतर कलमान्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारकत्र्यांनी केली असुन या प्रकरणी पुराव्यासह सर्व दस्तऐवजाच्या सत्यप्रती चौकशी अधिकायांकडे सुपुर्द केले आहेत.

चौकशीत दिरंगाई झाल्यास वकिलांच्या सल्ल्यानुसार मागील ६ महिन्याच्या काळात भाजपाचे तत्कालीन सभापती संतोष टाले व सर्व संबंधितांविरुध्द प्रत्येक प्रकरणाच्या वेगवेगळ्या फौजदारी स्वरुपाच्या तक्रारी देण्यात येतील असे तक्रारकत्र्यांनी म्हटले आहे या चौकशीमुळे खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात प्रचंड खळबळ निर्माण झाली असून भाजपा तेथे भ्रष्टाचार असे बोलल्या जात आहे आता अनागोंदी व नियमबाह्य काम करणाया सभापती व सचिवावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.