उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?

0

  मुंबई : भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.  त्यामुळे भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील नेमका कोणता नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार? अशी चर्चा होत असताना, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंचं नाव राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. शिवाय एकनाथ खडसे मोठ्या काळापासून भाजपवर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसेच तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर नाहीत ना अशा चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर उपस्थित होते. यावेळी एकनाथ खडसे यांना पक्षात प्रवेश देण्याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली असून पाटील-देवकर यांची मतेही जाणून घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

खडसे पक्षात आल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील बदलणारी गणितं आणि त्याचा पक्षाला होणारा फायदा-तोटा यासह खडसेंना संघटनात्मक जबाबदारी द्यायची की त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करायचा? याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, खडसे यांच्यासह भाजपच्या खासदार आणि खडसे यांच्या कन्या रक्षा खडसे याही राष्ट्रवादीत येणार का? यावरही बैठकीत चर्चा झाल्याचं कळतं. तसेच उत्तर महाराष्ट्रातील भाजपमधील नाराज नेते, पदाधिकारी यांनाही राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांचं पूनर्वसन करण्यावरही चर्चा झाल्याचं बोललं जातं. मात्र, याबाबत राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.