२४ तासांत देशात ८३ हजार ३४७ नवे करोनाबाधित आढळले

0

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागील २४ तासांत देशात ८३ हजार ३४७ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, १ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर करोनाबाधितांची एकूण संख्या ५६ लाख ४६ हजार ११ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण ५६ लाख ४६ हजार ११ करोनाबाधितांमध्ये ९ लाख ६८ हजार ३७७ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले ४५ लाख ८७ हजार ६१४ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ९० हजार २० जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.