एनआयएची पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये छापेमारी ; अलकायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक

0

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज मोठी कारवाई केली असून, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्नाकुलम येथील अनेक ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत एनआयएने पाकिस्तानी दहशतवादी संघटना अलकायदाशी संबंधिंत 9 दहशतवाद्यांना अटक केले आहे. पश्चिम बंगालमध्ये 6 आणि केरळमधून 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे. दहशतवाद्यांजवळील डिजिटल उपकरण, कागदपत्रे, धारधार शस्त्र, देशी शस्त्र, घरात स्फोटक तयार करण्याच्या संबंधिंत कागदपत्रे जप्त करण्यात आली.

एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, या लोकांना सोशल मीडियावर अल कायद्वारे कट्टरपंथी बनविण्यात आले होते. सोबतच दिल्लीसह अन्य भागात हल्ला करण्यासाठी प्रेरित केले जात होते. या उद्देशासाठी निधी जमा केला जात होता व शस्त्रसाठा खरेदी करण्यासाठी गँगमधील काही सदस्य दिल्लीला जाण्याची योजना बनवत होते.

 

एनआयए या दहशतवाद्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेण्यासाठी आणि पुढील तपासासाठी केरळ व पश्चिम बंगालच्या न्यायालयात सादर करणार आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे नाव मुर्शीद हसन, याकूल बिस्वास, मोर्शफ हुसैन, नजमुस साकिब, अबू सूफियान, मैनुल मंडल,  लियू यीन अहमद, अल मामून कमाल आणि अतितुर रहमान आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.