खामगाव मराठा समाजाच्या वतीने डफडे वाजवुन सर्वोच्च न्यायालयाचा अंतरीम आदेश खारीज करण्यासाठी निदर्शने

0

खामगांव:- सकल मराठा समाज खामगांव तालुका जिल्हा बुलडाण्याच्या वतीने मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरीम आदेश खारीज करण्यात यावा व मराठा आरक्षण सरसकट कायम लागु करावे यासाठी ठोस कारवाई करण्यासाठी मागणी करुन पाठ पुरावा करणेबाबत दि.17 सप्टेंबर 2020 रोजी आमदार सानंदा यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. हे निवेदन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी स्वीकारुन आपल्या भावना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मांडुन आपली मागणी रास्त आहे याबाबत पाठपुरावा करेल अशी ग्वाही यावेळी दिली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व महाविकास आघाडीतील सर्व घटक आपल्या सोबत असुन आपल्या रास्त मागणीला लवकरच न्याय मिळेल असा विश्वास सकल मराठा समाज बांधवांना दिला व आपल्या आंदोलनाला खामगांव मतदार संघातील सर्व काॅंग्रेस जणांचा व सानंदा परिवाराचा संपुर्ण पाठींबा राहिल अशी ग्वाही दिली.

तद्नंतर सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने शांतीच्या मार्गाने, सोशल डिस्टसिंग पाळुन, सामायिक अंतर ठेउन डफडे वाजवुन निदर्शने करण्यात आली. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे,छत्रपती शिवाजी महाराज की जय अश्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला.
यावेळी यावेळी मुख्य समन्वयक किषोरआप्पा भोसले,पंजाबरावदादा देषमुख, गणेष माने, षिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, स्वप्नील संजय ठाकरे, युवक काॅंग्रेसचे महासचिव तुशार चंदेल, निलेष देषमुख,गजानन ढगे पाटील, पिंटु जाधव, शंकर खराडे यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.