रेल्वे स्टेशन परिसरातील अवैध वाळूसाठा प्रकरणी,महसुल विभागाकडून पंचनामा

0

तहसिलदारांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून

बोदवड – औरंगाबाद – पहूर – जामनेर – मुक्ताईनगर रस्त्यावरील रस्त्यावरील सुरु असलेल्या रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी माती मिश्रित व निकृष्ठ दर्जाची वाळू वापरली गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.दि.१५ रोजी युवासेना तालूका समन्वयक तथा राष्ट्रीय छावा संघटनेचे विधानसभा संपर्कप्रमूख अमोल व्यवहारे यांनी बोदवड तहसिलदार हेमंत पाटिल यांना रेल्वे स्टेशन परिसरात अवैध वाळूसाठा साठवणूक झाल्याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर तहसिलदार श्री.पाटील यांच्या आदेशानूसार नाडगांव तलाठी यांनी सदर साठवून ठेवलेल्या वाळूचा पंचनामा केला.त्यात तलाठी नाडगांव यांना कुठल्याही प्रकारचे रॉयल्टी परवान्याचे कागदपत्रे संबंधित बांधकाम कंपनीच्या व्यवस्थापकाकडून देण्यात आले नसल्याने वाळू साठा अवैध असल्याचे निष्पन्न झाले.त्यामूळे सुमारे ४५ ब्रास वाळूचा पंचनामा तलाठ्यांनी केला असून आज सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाळू साठवल्याचा अधिकृत आकडा येथील सा.बां. विभागाच्या प्रकल्प व्यवस्थापक असलेले गौरव भंडारी यांच्याकडून घेतला जाणार असून त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसिलदार हेमंत पाटिल यांनी याबाबत बोलताना सांगितले.
गत दोन महिन्यां अगोदर येथे विनारॉयल्टी अवैधरित्या मुरुम वाहतूक होत असल्याचा प्रकार तहसिलदार यांच्या लक्षात आणून दिला होता.त्यानंतर उड्डाणपूल बांधकाम कामासाठी वापरण्यात येणा-या मुरुम वाहतूक रॉयल्टीतून तहसिल कार्यालयास १ लाख २० हजार रुपयांचा महसूल शिवसेना नाडगाव शाखेच्या सतर्कतेने जमा झाला होता.या पार्श्वभूमीवर हिच सतर्कता बाळगत परत अवैध वाळूसाठा आढळल्याने संबंधिताकडून महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतूदींनुसार कारवाई करण्यात येवून संबधितांकडून पाच पट दंड वसूल करण्यात यावा व तोच निधी बोदवड कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात यावा असेही निवेदनात म्हटले आहे.
संपूर्ण जिल्हाभरात गतवर्षापासून वाळूचा लिलाव बंद असून बोदवड तालूक्यात अवैध वाळू वाहतूकीचा गोरखधंदा तेजीत सुरु आहे.त्यामूळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बूडत आहे.बोदवड तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात उड्डाणपूलाचे बांधकाम करणा-या कंपनीच्या कामगारांचे विश्रांती गृह तसेच कार्यालय असून याच स्थळावरुन बांधकाम संदर्भातील कामकाज केले जाते.याच परिसरात संबंधित कंत्राटदाराकडून गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अवैध वाळूची साठेबाजी करण्याचा प्रकार सुरु असून गौणखनिज सरार्स लूटण्याचा प्रयत्न सुरु आहे.
कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमिवर शासनाच्या तिजोरीत खळखळाट निर्माण झाला आहे.त्यामूळे विनारॉयल्टी वाळू वाहतूकीमूळे शासनाचा महसूल बुडविण्याचा प्रकार झाल्याने आपण तात्काळ प्रत्यक्ष स्थळी पाहणी करुन साठवणूक केलेल्या अवैध वाळूच्या साठ्याचा पंचनामा करुन सदरील वाळूसाठा जप्त करावा तसेच दोषींवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी असे दिलेल्या निवेदनात अमोल व्यवहारे,राष्ट्रीय छावा संघटना विधानसभा संपर्क प्रमूख तथा युवासेना तालूका समन्वयक बोदवड यांनी म्हटले आहे.
सदर तक्रारीची प्रत आ.चंद्रकांत पाटिल,जिल्हाधिकारी जळगाव,उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनाही देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.