चाळीसगाव नगरपालीकेचे दोघं अपक्ष ,शहर विकास आघाडीत सामील

0

नगराध्यक्षांविरुद्ध थोपटले दंड, चोरांच्या उलट्या बोंबा , घृष्णेश्वर पाटील यांचेवर केला पलटवार

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव येथील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन चाळीसगाव नगरपालीकेच्या उपाध्यक्ष सौ आशाताई चव्हाण व आरोग्य सभापती सौ सायली रोशन जाधव या दोघं अपक्ष नगरसेविका वर आरोप केले होते,
या आरोपांना उत्तर देण्यासाठी आज अरीहंत मंगल कार्यालयात सोशल डिस्टन चे पालन करीत पत्रकार परिषद घेऊन पाटील यांच्या सर्व आरोपींना उत्तरे दिली.

गेल्या चार वर्षात नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज चालविले असून शहराची स्थिती बकाल झाली आहे. भूयारी गटार, पाणी पुरवठा योजनेचे काम नियमबाह्य पद्धतीने होत आहे. ठराविक पाच नगरसेवकांच्या प्रभागात कामे होतात. यामुळे शहरवासिय त्रस्त झाले आहे. विविध विकास कामे शासनाच्या अटी, शर्ती पायदळी तुडवून केली जात आहे. नागरिकांच्या हितासाठी आणि सरकार आहे त्यामुळे आपल्या प्रभागात विकासकामे होतील म्हणून आम्ही दोघे अपक्षांनी होता.परंतु आज
भाजपाला दिलेला पाठिंबा मागे घेत असून यापुढे शविआ सोबत असल्याची माहिती अपक्ष सदस्या व विद्यमान उपनगराध्यक्षा आशाबाई रमेश चव्हाण आणि आरोग्य सभापती सायली रोशन जाधव यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवारी शविआच्या सर्व व दोघा अपक्ष सदस्यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन नगराध्यक्षांना पदावर हटविण्यासाठी निवेदनही दिले आहे.
बुधवारी घेतलेल्या पत्रपरिषदेला विरोधी शविआचे १७ सदस्यही उपस्थित होते. सध्या शहरात सुरु असणारी विकासकामे नियमबाह्य पद्धतीने सुरु आहेत. मक्तेदार सर्व अटी – नियमांचा भंग करुन कामे करीत आहे. शहरात सर्वत्र खड्डे निर्माण झाले आहे. याचा त्रास नागरिकांना नाहक भोगावा लागत आहे. याबाबत नगराध्यक्षांना वेळोवेळी लेखी व तोंडी सुचना दिल्या. परंतू त्यांनी त्याकडे साफ दूर्लक्ष केले. प्रभागांमध्ये कामेच होत नसल्याने नागरिकांना उत्तरे देण्यास आम्ही असमर्थ ठरत आहोत. त्यामुळेच पालिकेतील सत्तेसाठी भाजपाला दिलेल्या पाठिंबा मागे घेत आहे. यापुढे शहराच्या विकासासाठी शविआ सोबत राहू. असेही सायली जाधव व आशाबाई चव्हाण यांनी सांगितले.
नागरिकांना आम्ही वेठीला धरले नसून विकास कामे आमच्या पाठिंब्यामुळेच मंजूर झाली. त्यामुळे विकास कामांना आमचा कधीही विरोध नव्हता. याउलट नियमबाह्य कामे करण्यास भाग पाडणारे भाजपाचे नगरसेवक तथा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील हेच या परिस्थितीला जबाबदार आहे. गत चार वर्षात माझ्या प्रभागात कामांसाठी निधी मिळाला नाही. घनकचरा ठेका नगराध्यक्षांनी त्यांच्या नातेवाईकाला मिळवून दिला. पाणी पुरवठा योजनेसाठी शहरात सर्वत्र खड्डे झाले आहे. याचा त्रास शहरवासियांना होत आहे. असा आरोपही सायली जाधव यांनी केला. पत्रपरिषदेला शविआचे उपनते सुरेश स्वार, शविआचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, रामचंद्र जाधव, रवींद्र चौधरी, सूर्यकांत ठाकूर, शेखर देशमुख, यास्मिनीबेग फकिरा, अलका गवळी, सविता जाधव शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष भगवान पाटील, शाम देशमुख, रोशन जाधव, आकाश पोळ आदि उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या विषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना दलालांमुळे पुतळ्याचे काम रखडले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळ्याचे काम गेल्या चार वर्षापासून दलालांमुळेच रखडले असून औरंगाबाद येथील शिल्पकारास काही सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी दमबाजी केली. यामुळे तीन शिल्पकार बदलले. असा आरोप रमेश चव्हाण व सुरेश स्वार यांनी केला. पालिकेतील सर्व गोपनीय कागदपत्रे हिरानंद बजाज ही सत्ताबाह्य व्यक्ति पाहते. असा खुलासा पालिकेतील कर्मचा-यांनीच केला आहे. ही बाब गंभीर आहे. मात्र नगराध्यक्षा त्याकडे दूर्लक्ष करतात. असेही रमेश चव्हाण यांनी सांगितले.

सात सदस्य संर्पकात
नगराध्यक्षांच्या एककल्ली कारभारास कंटाळून तसेच प्रभागात कामे होत नसल्याने त्यांना पदावरुन हटविण्यासाठी सत्ताधारी गटातील सात नगरसेवक शविआ व अपक्षांसोबत येण्यास तयार आहे. असे सुरेश स्वार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.