भातखंडे येथील बारावीचा आदिवासी विद्यार्थी अशोक बारेला (पावरा) याची घोडदौड

0

भातखंडे(प्रतिनिधी) येथील बन्सीलाल शंकर पावरा हा गृहस्थ पंधरा, सोळा वर्षापासून आपल्या परिवारासह मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील” केली” ह्या छोट्याशा गावातून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यातील भातखंडे याठिकाणी काम धंदा करण्यासाठी आला त्याचे कारणही तसेच आहे, त्या भागात काम धंदा नसल्यामुळे जमीन असून सातपुड्यातील पर्वतीय भागातील असल्यामुळे उतार-चढाव असलेली जमीन असल्याने त्या ठिकाणी कुटुंबाच्या चरितार्थासाठी काही पिकत नव्हते. त्याने त्यांचा प्रपंच चालत नव्हता बन्सीलाल शंकर पावरा यांना तीन मुले, एक लहान मुलगी त्यातील अशोक बन्सीलाल बारेला हा विद्यार्थी आदिवासी कुटुंबातून असून घरात कुठल्या सुखसोयी किंवा शैक्शणिक पार्श्वभूमी नसताना सुद्धा त्याची शिक्षणासाठीची धडपड वाखाणण्यासारखी आहे. बन्शीलालचद प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण येथीलच कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालय भातखंडे या ठिकाणी झाले.

सुरुवातीपासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला हा विद्यार्थी दहावी देखील उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. तेथे असताना, स्काऊट च्या माध्यमातून त्याला राज्य पुरस्कार प्राप्त आहे. पुढील शिक्षणासाठी जवळच असलेल्या जवाहर हायस्कूल गिरड व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी त्याने अकरावीसाठी प्रवेश घेतला, यावर्षी बारावी म् कला शाखेत त्याने ७०. १५ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला. त्याच्याशी संवाद साधला असता, त्याने माध्यमिक शिक्षण घेत असताना शाळेतील शिक्षक बी एन पाटील तर उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना जवाहर हायस्कूल गिरड चे शिक्षक डी डी भोसले व हिरे सर यांनी मला खूप अनमोल असे मार्गदर्शन केले असे सांगितले. नुकताच त्याचा भारतीय राष्ट्रीय युवा परिषद भडगाव आयोजित एस एस सी एच एस सी गुणवंत विद्यार्थी पुरस्कार स भडगावच्या तहसीलदार माधुरी आंधळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात करण्यात आला. एका आदिवासी विद्यार्थ्यांची घोडदौड निश्चितच इतरांनाही प्रेरक अशीच आहे. ज्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला त्यांच्या पदापर्यंत पोहचावा आणि त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी एक प्रामाणिक अपेक्षा जनमाणसातुन व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.