जिल्ह्यात आज ७४३ नवे रूग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात आज दिवसभरात ७४३ नवे रूग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक १९१ रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले.जिल्ह्यातील एकूण संख्या ४० हजार ९०८ इतकी झालीय. असे आढळले रुग्ण
जळगाव शहर २००, जळगाव ग्रामीण २५, भुसावळ ४३, अमळनेर ५६, चोपडा ६५, पाचोरा ४, भडगाव ३६, धरणगाव २३ , यावल १४, एरंडोल ४७, जामनेर ६१, रावेर २७, पारोळा ३४, चाळीसगाव ६६, मुक्ताईनगर १६, बोदवड ०९ व इतर जिल्ह्यातील ०७.

तर दिवसभरात ७२३ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे होणाऱ्यांची संख्याही २९ हजार ८९१ झाली. एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आता मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या १०२७ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.