व्हेंटिलेटर अभावी वरणगावातील कोरोना रुग्णाचा मृत्यू

0

शासनाने व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्याची मागणी

वरणगाव :  येथील शिवाजीनगरमधील गुरुदेव इलेक्ट्रीकल्सचे मालक अरूण तुकाराम येवले (६५) यांना ऐनवेळी प्राणवायूची क्रिया मंदावल्यामुळे जिल्ह्यात कुठेच व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी की, सदरील रुग्णाला फक्त थोडा ताप आला असता वरणगांवातील एका डॉक्टरने त्यांना कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यांची टेस्ट पॉझिटिव आली .व ते स्वतः भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब कोविड सेंटरमध्ये भरती झाले. परंतु दोन दिवसांनी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना रेल्वे कोवीड सेटरला नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात  आले व त्यांच्या मुलाने बाहेरून 35 हजार रुपयांची इंजेक्शन्स आणली त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवू लागली.परंतु मंगळवारी रात्री 10 चे सुमारास त्यांचा अचानक प्राणवायू अभावी जीव घाबरायला लागल्यामुळे व रेल्वे कोविड सेंटरमध्ये व्हेटिलेशन खाली नसल्यामुळे डॉ. नी त्यांच्या मुलास बोलवून त्यांना गोदावरी मधे हलविण्याचा सल्ला दिला. तेथेही व्हेटिलेशन मिळाले नाही . तेथून पुढे जळगांवातील घोषीत कोविड रुग्णालये अनुक्रमे सहारा ‘ रुबी ‘ गणपती ‘ ग्लोबल ‘ अॅपेक्स ‘ चिन्मय , व सरकारी रुग्णालय  इत्यादी रुग्णालयांमध्ये व्हेटिलेशन सुविधा  मिळण्यासाठी रात्रीच्या अडीच वाजेपर्यंत फिरविण्यात आले शेवटी कुठेच त्यांना प्राणवायू मिळण्याची सुविधा उपलब्ध होवू शकली नाही अखेर त्यांना पुन्हा रेल्वे कोवीड सेंटरला वापस आणले जात असतांना हॉस्पीटलच्या गेटजवळच त्यांची प्राणज्योत मालवली .                                     त्यांचा  एकुलता मुलगा कमलेश येवले याने अशी प्रातिक्रिया दिली की माझे बाबांची घरून जातांना प्रकृती ठणठणीत होती परंतु व्हेंटिलेशनची सुविधा न मिळाल्यामुळेच त्यांचा मृत्यु झाला.

शासनाने इतर खर्च कमी करून जास्तीत जास्त व्हेटिल शनची सुविधा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून रुग्ण दगावणार नाही. त्यावेळी वरणगांव भाजप शहर प्रमुख महेश सोनवणे यांनी खासदार रक्षाताई खडसे यांना भ्रमणध्वनीवरून सर्व हकीकत कथन केली असता त्यांनी याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.