जळगावात बेकायदेशीर दारूची वाहतूक ; ३७ हजार रूपयांच्या मुद्देमालासह दोन ताब्यात

0

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात बेकायदेशीर देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून दुचाकीसह ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. प्रभाकर भागवत चांदेलकर (वय-३०) आणि कैलास जानराव कोळी (वय-२७ दोन्ही रा. सुप्रिम कॉलनी) असे दोघा आरोपींचे नाव आहे.

याबाबत सविस्तर असे की, एमआयडीसी सेक्टरमधील सुप्रिम कॉलनी परिसरात बेकायदेशीर दारूची वाहतूक होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना दुपारी मिळाल्यानंतर त्यांनी पथक तयार करून पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक सचिन मुंडे, पो.कॉ. सतिश गर्जे, पो.कॉ. विजय बावस्कर आणि पो.कॉ. मुकेश पाटील यांना घटनास्थळी रवाना केले. एमआयडीसीतील वेगा कंपनीच्या समोर दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएच ५०२९) दुचाकीवर देशी दारूचे दोन बॉक्स घेवून जात असतांना संशयित दोघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून ३७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.

पो.कॉ. मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.