खामगांव कृ.उ.बा.समिती धान्य किट वाटपात 35 लाखांचा भ्रष्टाचार

0

खामगांव (प्रतिनिधी) : खामगांव कृ.उ.बा.स.मध्ये मागील सहा महिन्यात सभापती, सचिव व बेकायदेशीर ठरावाच्या बाजुने असलेल्या संचालकांनी सर्व नियम धाब्यावर बसवुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्टाचाराबाबत माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, बाजार समितीचे तत्कालीन संचालक श्रीकृष्ण टिकार यांच्यासह पाच संचालकांनी मा.जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मा.जिल्हा उपनिबंधक यांनी कृ.उ.बा.स.मध्ये झालेल्या गैर प्रकाराबाबत कृषी उत्पन्न पणन अधिनियम (विकास व विनीमयन) 1963 चे कलम 40-ब नुसार चैकशी करण्याचे आदेश देउन श्री.कोल्हे,सहायक निबंधक,सहकारी संस्था,शेगांव यांची चैकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करुन प्रकरण 45 दिवसात चैकशी अहवाल सादर करण्याचे आदेश 20/07/2020 रोजी दिले होते.

त्या अनुषंगाने मंगळवार दि.15 सप्टेंबर 2020 रोजी चैकशी अधिकारी श्री कोल्हे यांनी  तक्रारीची संबंधीत सर्वांना आपला लेखी जवाब सादर करण्याचे आदेश दिले होते. खामगांव कृ.उ.बा.स.च्या कार्यालयात चैकशी अधिकारी श्री कोल्हे यांनी या प्रकरणी संबधीतांचे म्हणणे जाणुन घेतले. तक्रारदार माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,बाजार समितीचे माजी संचालक श्रीकृश्ण टिकार,माजी संचालक संजय झुनझुनवाला,माजी संचालक विवेक मोहता,माजी संचालक राजेष हेलोडे व तुशार चंदेल यांनी झालेल्या भ्रश्टाचाराबाबत आपला लेखी जवाब व त्या संबंधींची महत्वपुर्ण कागदपत्रे चैकषी अधिकारी यांच्याकडे सुपुर्द केले व संबंधीतांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी  धान्य किट वाटपामध्ये झालेला 35 लाखांचा भ्रष्टाचार माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी चैकशी अधिकारी यांच्या निदर्शनास आणुन दिला. कोव्हिड-19 च्या काळात प्रधान सचिव यांच्या पत्राचा दुरुपयोग करुन सभापती, सचिव व त्यांच्या बाजुने असलेल्या संचालकांनी संगनमताने बनावट दस्तवेज तयार करुन कोणतीही ई निविदा प्रक्रिया पुर्ण न करता व वरीष्ठांची मान्यता न घेता दुर्बल घटकातील गरजु लोकांसाठी अन्नधान्य किट वाटप सुरु केले. या योजनेत मोठया प्रमाणात गैर प्रकार झाले असुन धान्य किट वाटप सुरु करण्यासाठी पुरवठा दाराकडुन दरपत्रके मागवितांना नियमाप्रमाणे शासनाच्या अ वर्ग मध्ये समावेश असलेल्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रकाशित करणे आवश्यक होते. परंतू सभापती व सचिव यांनी संगनमत करुन शासन मान्यता नसलेल्या व शासकीय दर लागु नसलेल्या अत्यंत कमी प्रमाणात खप असलेल्या साप्ताहिक समाजनिष्ठा या वृत्तपत्राच्या दि.13/04/2020 रोजीच्या अंकात दरपत्रक मागविण्याबाबत बनावट जाहिरात प्रकाशित करण्यात आली. में.गिरीराज सुपर मार्ट, में.प्रिया एजन्सीज, में.रमन सेल्स या पुरवठा दारांनी बाजार समितीकडे दरपत्रके सादर केली. परंतू त्यांनी बाजार समितीकडे सादर केलेल्या दरपत्रकावर कुठलेही दिनांक नमुद नाही व त्यावर सभापती व सचिव यांची सही सुध्दा नाही. तसेच कृ.उ.बा.स.च्या आवक-जावक विभागाकडे सुध्दा पुरवठा दारांनी सादर केलेल्या पत्रकाची नोंद नसुन हे दर पत्रके बंद लिफाफामध्ये आलेले नाही. दरपत्रके उघडतांना एकही पुरवठादार तेथे हजर नव्हता. दरपत्रके मंजुर करतांना असलेल्या कागदावर फक्त सभापती व सचिव यांच्या सहया आहेत. या बाबीवरुन दस्तवेज बनावट व खोटे असल्याचे दिसुन येते. तसेच जाहिरातीमध्ये पुरवठादारांना कुठलीही अॅडव्हान्स रक्कम देण्याची तरतुद नसतांना में. गिरीराज सुपर मार्ट यांना 16 लक्ष रुपयांचे अॅडव्हान्स रक्कम देण्यात आली. त्यासाठी जीएसटी बील सुध्दा खामगांव बाजार समितीने अदा केलेले आहे. धान्य किट वाटपामध्ये सर्व नियम धाब्यावर बसवुन गैरप्रकार करण्यात आलेला आहे. या संबंधींचे रेकाॅर्ड तपासण्यात यावे तसेच नियमबाहय व बेकायदेशीररित्या धान्य किट वाटप करुन बाजार समितीचे आर्थिक नुकसान केल्याबदद्ल सभापती , सचिव व ठरावाच्या बाजुने असलेले संचालक सह सर्व व्यक्तींवर चैकशीअंती भ्रष्टाचार सिध्द झाल्यास त्यांचेवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करावी व त्यांच्याकडून रकमेची वसुली करावी असे तक्रारदात्यांनी चैकशी अधिका-यांना दिलेल्या जवाबात मागणी केली आहे.

या चैकशीमुळे खामगांव कृ.उ.बा.स.च्या क्षेत्रात प्रचंड खळबळ निर्माण झाली असुन अनागोंदी व नियमबाहय काम करणाया सभापती व सचिवांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.