जळगावात प्रलंबित वेतनासाठी बस कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

0

जळगाव । राज्य परिवहन विभागाचे जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित वेतन मिळावे यासाठी आज नवीन बसस्‍थानकासमोर काळ्या फिती लावून आंदोलन केले. यावेळी दोन महिन्याचे वेतन तत्काळ मिळावे यासाठी विभाग नियंत्रक यांना

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य परिवहन विभागाचे जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित वेतन मिळावे यासाठी ८ सप्टेंबर २०२० रोजी निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाची अद्यापपर्यंत दखल न घेतल्याने जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी नवीन बसस्थानकासमोरील आवारात आंदोलन करण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात ३० टक्के हजेरी सर्व कर्मचाऱ्यांची होती. उर्वरित दिवस कर्मचाऱ्यांनी भाजीपाला विकणे, गवंडी काम करणे, लहान उद्योग धंदे केले. आज दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांना चरितार्थ चालविणे अवघड झाले आहे. प्रलंबित वेतन न मिळाल्यात आगामी काळात आंदोलन अजून तिव्र स्वरूपाचे होईल याला सर्वस्वी जाबाबदार प्रशासनाची राहणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.