भातखंडे खुर्द ग्रामपंचायत प्रशासकपदी सुनिल पाटील

0

भातखंडे (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या भातखंडे खुर्द ग्रामपंचायत प्रशासकपदी सुनिल पाटील विस्तार अधिकारी (एन आर एल एम) यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी भातखंडे खुर्द ग्रामपंचायत चे मावळते सरपंच गणेश वाघ,यांनी पाटील यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.त्यावेळी ग्रामसेवक नितीन बोरसे, दत्तु कुमावत, सदस्य आदी उपस्थित होते.

गेल्या मार्च महिन्या पासुन सुरु असलेल्या व दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची मुदत संपल्यानंतर निवडणूका घेणे शक्य नसल्याने अखेर ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा आदेश राज्याचा ग्रामविकास विभागातर्फे काढला गेला.या अगोदर पालक मंत्री, आमदार, जिल्हाधिकारी यांचा समन्वयाने सरपंच निवड होणार अशी चर्चा असताना गावातुन उत्सुकता लागली असताना कोणाची वर्णी प्रशासन पदी लागते? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय अधिकारी, किंवा कर्मचाऱ्यांचीच प्रशासक पदी नियुक्ती करण्यात यावी असा आदेश न्यायालयाने दिला होता.त्याच आदेशानुसार या विषयाला पुर्णविराम मिळाला असुन.भातखंडे खुर्द ग्रामपंचायत प्रशासन पदी विस्तार अधिकारी सुनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.