अ‍ॅपलची नवीन स्मार्ट वॉच सिरीज-६ लाँच; जाणून घ्या किंमत-फीचर्स

0

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी टेक कंपनी अ‍ॅपलने आपले नवे गॅझेट्स सादर केले आहेत. यात सिरीज-६ स्मार्ट वॉचचा समावेश आहे. आतापर्यंत हृदयाचे ठोके आणि ईसीजी घेऊ शकणाऱ्या अॅपल वॉचच्या नव्या आवृत्तीत शरीरातील ऑक्सिजनची पातळीही सहज कळू शकेल. करोना महामारीदरम्यान ब्लड ऑक्सिजन फीचर टेस्ट करण्याची सर्वाधिक गरज असते.

अ‍ॅपल वॉच सीरिज ६ मध्ये कंपनीनं एलिव्हेशन ट्रॅकिंग हे फीचरही दिलं आहे. आपण किती उंचीवर आहोत हेदेखील हे घड्याळ सांगू शकणार आहे. तर दुसरीकडे अ‍ॅपल वॉचचं डिझाइन थोडंफार पूर्वीप्रमाणेच दिसणार असून त्यात फारसे बदल दिसणार नाहीत. अ‍ॅपल वॉच सीरिज ६ मध्ये यावेळी स्टॅपचं डिझाईन बदलण्यात आलं आहे. तर फिटनेससाठीही यात अनेक फीचर्स देण्यात आले असून स्लीप ट्रॅकिंगही यापैकी एक आहे.

वॉच सिरीज-६ (जीपीएस)ची प्रारंभीची किंमत ४०,९०० रुपये आणि वॉच सिरीज-६ (जीपीएस+ सेल्युलर)४९,९०० पासून सुरू होईल. कंपनीने आतापर्यंतचे सर्वात स्वस्त अ‍ॅपल वॉच एसई हे पण लाँच केले. याची प्रारंभीची किंमत १९९ डॉलर (सुमारे १४,५०० रुपये) आहे. अ‍ॅपल वॉच एसईची किंमत २७९ डॉलर (२०,५०० रुपये) आहे. मात्र, कंपनीने बहुप्रतीक्षित आयफोन-१२ लाँच केला नाही. याचे अपडेटही कंपनीने दिले नाही. कंपनीचे सीईओ टिम कूक यांनी व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये हे गॅजेट्स लाँच केले.

अ‍ॅपल वॉच एसई दिसण्यात अ‍ॅपल वॉच सीरिज ३ प्रमाणे आहे. यामध्ये फॉल डिटेक्शन फीचरही देण्यात आलं आहे. तसंच ते स्वीम प्रूफही आहे. त्यात फॅमिली सेटअप, फेस शेअरिंग, स्लीप ट्रॅकिंगसारखे फिचर देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे अ‍ॅपल वॉच सीरिज ६ मध्ये एस ६ हा प्रोसेसर देण्यात आला असून पूर्वीच्या प्रोसेसरच्या तुलनेत तो २० टक्के अधिक फास्ट असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. याव्यतिरिक्त हे वॉच १५ सेकंदात ब्लड ऑक्सिजन लेव्हलदेखील मॉनिटर करतं. तर याचा ऑलवेज ऑन डिस्प्ले गेल्या व्हर्जनच्या तुलनेत अधिक ब्राईट असल्याचंही सांगण्यात आलं.

Leave A Reply

Your email address will not be published.