नोकरीचे आमिष दाखवून नऊ लाखात फसवणूक ; गुन्हा दाखल

0

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील नेमाडे कॉलनीतील भावंडांना सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नऊ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात एका जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.विशेष बाब म्हणजे यातील आरोपी फिरोज तडवी याने विधवा महिलेचीही फसवणूक केली आहे.

बाजारपेठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी फिरोज सिकंदर तडवी (रा. लक्ष्मीनारायण नगर भुसावळ) याने दिनांक १८ जुलै २०१३ ते १५ डिसेंबर २०१३ दरम्यान आपले वडील सिकंदर तडवी हे तहसीलदार व उपजिल्हाधिकारी आहे व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील एक मुख्याध्यापक त्यांचे मित्र असल्याचे सांगून दोन्ही भावंडांना सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून येथील नेमाडे कॉलनीतील रहिवासी जावेद रफिक तडवी (वय ४० ) व लहान भाऊ सलीम यांना सरकारी नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून त्यांच्या वडिलांकडून ९ लाख ३० हजार रुपये घेतले.

मात्र २०१३ ते २०२० पावेतो अद्याप पर्यंत नोकरी लावून न दिल्याने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.म्हणून फसवणूक प्रकरणी  बाजारपेठ पोलीस स्टेशनला आरोपी तडवी विरुद्ध  जावेद रफिक तडवी यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीसात फिरोज तडवी (वय ४० रा.नेमाडे कॉलनी) यांच्या ‌फिर्यादीवरून गुरनं ८३८ /२० भादंवि ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश गोटला तपास करीत आहे.

विधवा महिलेचीही केली फसवणूक  – 

विशेष बाब म्हणजे यातील आरोपी फिरोज तडवी याने विधवा महिलेचीही  फसवणूक केली असून महिलेच्या मयत पतीच्या नावे असलेल्या २९ लाखांची विमा रक्कम काढून देण्यासाठी नऊ लाख रुपये घेऊन  रक्कम बनावट चेकद्वारे काढून घेतली होती. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जुलै महिन्यात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ३१ जुलै रोजी आरोपीला अटकही करण्यात आली होती. सदर आरोपीने भुसावळ शहरातील काही लोकांना नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन फसवणूक केल्याचे समोर आल्याने  फसवणूक झालेल्या लोकांनी पोलीस अधिकारी यांच्याशी त्वरीत  संपर्क साधण्याचे आवाहन बाजारपेठ पोलिसांनी केले आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.