देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 50 लाखांचा टप्पा ओलांडला ; पाहा २४ तासातील आकडेवारी

0

नवी दिल्ली – देशामध्ये कोरोनाच्या संसर्गाचा कहर सुरूच आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ५० लाखांचा टप्पा ओलांडला. आहे. तसेच कोरोनामुळे देशात आतापर्यंत तब्बल ८२ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमधून ही भयावह माहिती समोर आली आहे.

गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाच्या संसर्ग झालेल्या ९० हजार १२३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर या दिवसभरात तब्बल १२९० जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५० लाख २० हजार ३६० एवढी झाली आहे. तर १२९० जणांच्या मृत्यूंमुळे कोरोनाबळींचा आकडा ८२ ह्जार ६६ वर पोहोचला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात 39 लाख 42 हजारहून अधिक लोकांनी कोरोनाला हरवलं आहे. मंगळवारी 82 हजार 844 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवसांत रिकव्हरी रेट 0.45 टक्के वाढला असून एकूण 78.45 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या देशात 9 लाख 95 हजार 933 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 3 महिन्यांतील आकडेवारी पाहिल्यास जगातील सर्वाधिक 21.8% रुग्ण फक्त भारतातच आढळले. 15 जून रोजी देशात कोरोना रूग्णांची संख्या 3 लाख 43 हजार 70 होती, ती 15 सप्टेंबरपर्यंत 50 लाख 18 हजारांहून अधिक झाली. या 3 महिन्यांत 46 लाख 74 हजार 964 नवीन लोकांना संसर्ग झाल्याचं समोर आलं.

Leave A Reply

Your email address will not be published.