चाळीसगाव नगराध्यक्षा सौ आशालता चव्हाण यांना पदावरून हटविण्याची मागणी

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) :– चाळीसगाव नगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ आशा लता विश्वास चव्हाण हृया जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्यात असमर्थ ठरत असल्याचा ठपका ठेवत चाळीसगाव नगर परिषदेतील उपनगराध्यक्षा सौ आशाताई रमेश चव्हाण आणि अपक्ष नगरसेविका तथा आरोग्य सभापती सौ शायली रोशन जाधव यांच्यासह शहर विकास आघाडीची एकूण १८ नगरसेवक असे एकूण २० नगरसेवकांनी, सौ आशालता चव्हाण यांना नगराध्यक्ष पदावरून हटविण्याबाबतची मागणी जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर वीस नगरसेवकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

या निवेदनात मागील चार वर्षापासून पत्रव्यवहार, तोंडी चर्चा ,सूचना देऊनही नगराध्यक्षांच्या कार्यपद्धती कुठली सुधारणा झालेली नाही, चार-पाच महिने पासून मासिक सभा होत नाही. झाली तर प्रोसिडिंग लिहिले जात नाही,चुकीचे ठराव केले जातात. नपाच्या कारभारात बाहेरच्या व्यक्तींचा हस्तक्षेप असतो ठराविकच नगरसेवकांच्या वार्डात कामे होतात. नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही अशा परिस्थितीत शहराची अवस्था अतिशय बकाल झालेली आहे अशा अनेक अडचणींना आम्ही नगरसेवक त्रस्त झालेले असताना त्याअनुषंगाने असमर्थ ठरणाऱ्या नगराध्यक्षांना नगराध्यक्ष पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून मांडताना नगरपरिषद नगरपंचायती 1969 नियमांच्या आधारे नगराध्यक्षांना पदावरून बडतर्फ करण्यात यावे व आपणही स्वतः वस्तुस्थिती जाणून घेत निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर सह्या असलेल्या नगरसेवकांची नावं सौ आशा रमेश चव्हाण, सुरेश रामचंद्र स्वार्, आनंदा चिंधा कोळी, मनिषा शाम देशमुख, शेखर गुलाबराव देशमुख, सौ सायली रोशन जाधव, वंदना जगदीश चौधरी, गिताबाई भगवान पाटील, शंकर रामा पोळ, सौ संगीता राजेंद्र गवळी, सौ योगिनी भूषण ब्राह्मणकर, दीपक उत्तमराव पाटील, सौ रंजना यशवंत सोनवणे, रामचंद्र यशवंत जाधव, रवींद्र गिरीधर चौधरी, सौ अलका सदाशिव गवळी, सविता सत्‍यवान राजपूत, सुर्यकांत तुकाराम ठाकूर, सुरेश हरदास चौधरी, यास्मीन बी फकिरा बेग.

Leave A Reply

Your email address will not be published.