गणेशमूर्ती कारखानदारांना सर्वतोपरी मदत करणार : खा. सुनील तटकरे

0

पेण :- कोरोना महामारीचे जागतिक संकट, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींंवरीर बंदी, त्यातच निसर्ग चक्रीवादळाने गणेशमूर्ती कारखानदारांचे कंबरडे मोडले आहे. यासंदर्भात गणेशमूर्ती कारखानदारांनी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते.

पेण तालुक्यातील हमरापूर विभागातील गणेशमूर्ती कारखानदारांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी हमरापूर येथे भेट दिली. यावेळी गणपती कारखानदारांचे प्रश्न येत्या लोकसभेच्या अधिवेशनात मांडुन तो सोडण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी हमरापूर येथे गणपती कारखानदारांना दिले. गणपती कारखानदार, मूर्तिकार, रंग बनविणार्‍या कंपन्या, काथा व माती व्यावसायिक, टेंमो चालक, घरगुती पेंटर व हमाल अश्या लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचा हा व्यवसाय आहे.

यावेळी त्यांच्यासह पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत, गणेशमूर्ती संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, नायब तहसिलदार कांबळे, पेणचे माजी नगरसेवक जितेंद्र ठाकूर, जि. प. सदस्य डी. बी. पाटील, जगन म्हात्रे, हमरापूर विभाग गणेश मंडळ अध्यक्ष कुणाल पाटील,सागर हजारे, अशोक मोकल, दीपक गुरव, नितीन मोकल, अरविंद पाटील, कैलास पाटील, गोपीनाथ मोकल, राजन पाटील, संजय यादव, प्रदीप म्हात्रे आदीसह गणपती कारखानदार मोठया संख्येने उपस्थित होते.

येत्या 2 दिवसात केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करून गणपती कारखानदारांच्या समस्या मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारने समन्वयाची भूमिका घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.