पेण मधील सर्व पत्रकारांची पुढील दोन दिवसांत अँटीजन टेस्ट होणार

0

पेण : रायगड जिल्ह्यातील पत्रकारांचे मित्र तथा मर्गदर्शक स्वर्गीय संतोषजी पवार यांचे कोरोनामुळे नुकतेच निधन झाल्याने जिल्ह्यातील सर्व पत्रकारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे पेणमधील कोणत्याही पत्रकारावर असे संकट येऊ नये म्हणून, आज पेण प्रेस क्लब व पेण मधील पत्रकारांनी प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार यांची भेट घेऊन घडलेल्या परिस्थितीचे गांभीर्य सांगण्यात आले.

यादरम्यान प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी आरोग्य यंत्रणेला दूरध्वनी वरून संपर्क साधून पुढील २ दिवसाच्या आत पेण मधील सर्व पत्रकारांची अँटीजन टेस्ट करण्याचे आदेशच दिले. तसेच जे पत्रकार पॉझिटिव्ह येतील यांच्या परिवाराचीही अँटीजन टेस्ट करण्याचे आणि पुढील उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.