पालीकेत आॅनलाईन सभेच्या मुद्यावरुन विरोधी नगरसेवक आक्रमक

0

न.प.कामकाजात हस्तक्षेप करण्याच्या उदद्शाने सभागृहात आलेल्या नगराध्यक्षा पती वैभव डवरे यांना
विरोधी नगरसेवकांनी सभागृहाबाहेर पिटाळुन लावले

खामगांव () खामगांव नगर पालीकेची विशेष सभा गुरुवार दि.3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नगर पालीकेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली असल्याची नगरसेवकांना देण्यात आलेल्या सभासुचना पत्राद्वारे कळविण्यात आले होते. सभेसाठी विरोधी पक्षाचे नगरसेवक नगर पालीका सभागृहात हजर झाले असतांना पालीका प्रशासनाकडुन सभा आॅनलाईन असल्याचे कळविण्यात आले. या मुद्यावरुन काॅंग्रेस,राष्टवादी काॅंग्रेस व मित्र पक्षाचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले.यावेळी न.प.च्या कामकाजात ढवळाढवळ करणाच्या उदद्ेशाने सभागृहात आलेल्या नगराध्यक्षापती वैभव डवरे यांना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर पिटाळुन लावले. या सर्व प्रकारामुळे नगर पालीकेमध्ये वातावरण चांगलेच तापले होते.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, 3 सप्टेंबर रोजी न.प.ची विशेष सभेमध्ये आयोजित करण्यात आली होती. खामगांव शहराची दुसरी सुधारीत विकास योजना महाराष्ट प्रादेशिक नियोजन व नगररचना व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 21 अन्वये जाहीर इरादा प्रसिध्दीबाबत आणि नगर पालीकेतील सफाई कामगारांना शासकीय सुटीच्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदला देण्यासाठी तयार केलेल्या उपविधीच्या मसुद्यास मान्यता प्रदान करण्याबाबत विचारविनीमय करुन निर्णय घेण्याबाबत सभा आयोजित करण्यात आली होती.

न.प.सदस्यांना नगराध्यक्षा यांच्या कडुन देण्यात आलेल्या सभा सुचनेद्वारे सदर सभा ही न.प.सभागृहात होणार असल्याचे कळविण्यात आले होते व सभा सुचनापत्रावर सभा आॅनलाईन असल्याचा कोठेही उल्लेख नव्हता. सभेसाठी विरोधी पक्षाचे नगरसेवक पालीका सभागृहात पोहचले असता न.प.प्रशासनाकडुन सभा आॅनलाईन असल्याचे कळविण्यात आले. आॅनलाईन सभेच्या मुद्यावरुन न.प.सदस्यांची व खामगांवच्या जनतेची खोटेपणा करणा-या न.प.सत्ताधा-यांविरुध्द काॅंग्रेस व मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भुमिका घेतली.

यावेळी सभागृहामध्ये उपस्थित असलेले न.प.काॅंग्रेस गटनेता राणा अमेयकुमार सानंदा, राष्टवादीचे नगरसेवक देवेंद्रदादा देशमुख, भारिपचे नगरसेवक विजय वानखडे,न.प.सदस्य श्रीमती सरस्वतीताई खासने, नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, नगरसेवक भुषण शिंदे यांच्यासह काॅंग्रेस व मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी न.प.सदस्यांना अंधारात ठेउन घेतलेल्या आॅनलाईन सभेच्या मुद्यावरुन आपली नाराजी व्यक्त केली आणि सभागृहात असलेल्या नगराध्यक्षांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालुन सत्तधा-यांच्या मनमानी कारभाराचा निषेध नोंदवुन घोषणाबाजी केली. यावेळी नगराध्यक्षा सौ.अनिता डवरे यांचे पती वैभव डवरे यांनी सभागृहात येवुन आरडाओरड करुन न.प.च्या कामकाजात हस्तक्षेप केला. नगराध्यक्ष पतींना न.प.च्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार आहे असा प्रश्न विचारुन विरोधी पक्षाचे सदस्य वैभव डवरे यांच्यावर चांगलेच आक्रमक झाले व त्यांनी नगराध्यक्षपतींना सभागृहाबाहेर पिटाळुन लावले.

नगरसेवकांची दिशाभूल करुन न.प.सत्ताधा-यांनी आॅनलाईन विशेष सभा घेतली असल्याच्या कारणावरुन काॅंग्रेस व मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी न.प.मधील सत्ताधा-यांचा मनमानी कामकाजाचा निषेध केला असून अवैधरित्या घेतलेल्या सदर सभेची चैकशी करुन सभा रदद् बातल करावी अशी मागणी काॅंग्रेस व मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.