कृषीदूतातर्फे शेतकऱ्यांना शेतीविषयक अँपचे मार्गदर्शन

0

लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथील कृषीदूत पाटील पवन अशोक यांनी चोपडा तालुक्यातील काजीपुरा गावात सुरू असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत शेतकऱ्यांना विविध शेती आप्सचे माध्यमातून कसा फायदा होईल याचे मार्गदर्शन केले. अश्या विविध अँप्सची माहिती दिली. हवामानाचा अंदाज, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतातील पिकाला योग्य हमीभाव कसा मिळेल, शेतीपूरक व्यवसाय, मातीपरीक्षण याबाबत मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले या कार्यक्रमला त्याला प्राचार्य डॉ पी.एल.पटेल सर,प्रा.एम.ए कोळी सर,प्रा.सी.यु पाटील सर व इतर शेतकऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी रघुनाथ पवार, अशोक पाटील, योगेश पवार, अरुण पवार ,बापू भाऊ, चेतन पाटील, अक्षय पाटील यदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.