शिवसेनेचे जेष्ठ नेते विजयराज शिंदे यांचा भाजपात प्रवेश

0

बुलढाणा : शिवसेनेची बुलंद तोफ, बुलढाणा मतदार संघाचे माजी आमदार, शिवसेनेचे जेष्ठ नेते विजयराज शिंदे यांनी आज भाजपाच्या शीर्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे सागर या निवासस्थानी भाजपा मध्ये प्रवेश केला.

यावेळी ना फडणवीस म्हणाले की, भाजपाचे संघटन वाढविण्यासाठी विजयराज शिंदे आपले संपूर्ण योगदान देतील अशी अपेक्षा करतो. त्यांचे भारतीय जनता पार्टी मध्ये हार्दिक स्वागत. यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ.डॉ.संजयजी कुटे,बुलढाणा जिल्हा भाजपा अध्यक्ष तथा खामगाव मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर, चिखली मतदार संघाच्या आमदार सौ.श्वेताताई महाले, बुलढाणा भाजपाचे योगेंद्र गोडे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.