जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच ; आज ५७१ नवे रूग्ण आढळले

0

जळगाव (प्रतिनीधी) जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आज उद्रेक झाल्याचे आकड्यांवरुन समोर आले. आज दिवसभरात जिल्ह्यात विक्रमी ५७१ रुग्णांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक १४१ रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १५ हजार ९६२ वर पोचली.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर १४१, जळगाव ग्रामीण ४७, भुसावळ २८, अमळनेर १७, चोपडा ५६, पाचोरा १४, भडगाव ०९, धरणगाव ४०, यावल १७, एरंडोल १७, जामनेर ३०, रावेर १६, पारोळा ३०, चाळीसगाव ७८, मुक्ताईनगर २१, अन्य जिल्ह्यातील १०.

वाढत जाणाऱ्या रूग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडत आहे. एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना त्या तुलनेत मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने ती दिलासादायक बाब आहे. आज दिवसभरात ०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ६२७ झाली आहे. तर आज ३०१ रूग्ण बरे झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.