मोठी बातमी: सोन्याचा भाव ५० हजार रुपयांखाली ; जाणून घ्या

0

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉक डाऊनमुळे सोने चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र गेल्या काल सोने चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. आजही सोन्याच्या दरात घसरण झाली असून सोन्याचा भाव तीन टक्क्यांपेक्षा जास्त घसरून प्रति १० ग्रॅम ४९,९५५ रुपये इतका झाला. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफारुपी विक्रीमुळे तसेच करोनावर लस मिळत असल्याच्या वृत्तानं गुंतवणूकदार निश्चिंत झाल्यामुळे सोन्याच्या खरेदीऐवजी विक्रीकडे कल दिसून येत आहे, परिणामी सोन्याचे भाव घसरत आहेत.

सोन्याच्या दरात सुरू असलेली घसरण बुधवारीही सुरूच राहिली असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस १,८७२.१९ डॉलर्स या तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवर आला. भारतातही याचे पडसाद उमटले असून सोन्याचा भाव तीन टक्क्यांपेक्षा जास्त घसरून प्रति १० ग्रॅम ४९,९५५ रुपये इतका झाला.

अमेरिकेतील गोल्ड फ्युचर्समध्येही २.४ टक्क्यांची घसरण होऊन ते प्रति औंस १,९०० डॉलर्सवर आले आहेत. गेल्या सत्रामध्ये तब्बल १५ टक्क्यांनी घसरलेले चांदीचे भावही आणखी २.८ टक्क्यांनी घसरले व प्रति औंस २४.११ डॉलर्स झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे भारतातही सोन्याचे व चांदीचे भाव घसरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.