भाजपचा नेता शरद पवारांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

0

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली असताना दुसरीकडे राज्यातील राजकारणही विविध घडामोडींमुळे तापलेले आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर शेलारांसोबतचा फोटो शेअर करून दिली. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पण आशिष शेलार यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट का घेतली. तसे शेलार आणि शरद पवार यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी सांगितले होते..

Leave A Reply

Your email address will not be published.