वरणगावात खतांनासाठी भाजपातर्फे कृषी अधिकाऱ्यांना घेराव

0

वरणगाव : शेतकऱ्याना काही दिवसा पासुन रासायनिक खताची कृतीम टाचंई असल्याने तालुका कृषी अधिकाऱ्यास शेतकरी व राजकिय पदाधीकाऱ्यानी घेराव घालुन जाब विचारून खते न मिळाल्यास रस्ता रोकोचा इशारा दिला.

शहरातील आज सकाळी एका कृषी केंद्र वर तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती भुसावळ यांना वरणगाव येथे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी बोलवून शेतकरी , व भाजपाच्या वतीने घेरावा घालून दोन तास जनआंदोलन केले.

शहरातील व परिसरातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई सरकार मुद्दाम करत असल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज जोरदार आंदोलन करण्यात आले. आजच्या आज १५ , १५ व १० , २६ २६व २४ , २४ व १६ , १६ यासह रासायनिक खतांसाठी शेतरकाऱ्याना महिन्या पासून तासन तास रांगेत उभे राहूनही खते पुरेश्या प्रमाणात नमिळात नसल्यामुळे शेतकऱयांचे हाल मोठ्याप्रमाणात होत आहे.

आज नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख आखलाक, संजय कुमार जैन, शामराव धनगर, कामगार नेते मिलिंद मेढे, हाजी अल्लीउद्दीन सेठ हितेश चौधरी, संजय सोनार, आकाश निमकर, राहुल जंजाळे सुनील माळी, विवेक शिवरामे, जय चांदणे, विशाल कुंभार, नरेंद्र बावणे, विक्की चांदेलकर, अनिकेत चांदखेडकर, गौरव घाटोळे यांच्या सह आसंख्य शेतकरी व भाजपा कार्यकर्त्यानी जोरदार आंदोलन केले भुसावळ तालुक्याला चार हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा होणे गरजेचा असतांना केंद्र सरकारने मुबलक खते पाठवली. मात्र, आज पर्यंत पंधराशे मेट्रिक टन पुरवठा झाला आहे. हा एका प्रकारे शेतकरी वर्गावर अन्याय महराष्ट्र सरकार करीत असल्याने कृषि केंद्रावर तालुका कृषी अधिकारी श्री धांडे यांना दोन तास घेरावा टाकून कृषी केंद्रात थांबून ठेवले तसेच गोडाऊन वर श्री धांडे यांना नेऊन गोडाऊन ची तपासणी केली. मात्र गोडाऊन मध्ये सुद्धा युरिया ची थैली आढळून आली नसल्याने जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी धांडे यांनी मोबाइल वर संपर्क साधून वरणगाव ला युरिया उपलब्ध करण्याची विनांती केली. त्यानुसार तात्काळ युरिया खते पाठवण्याचे सांगितल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी सरकारच्या विरुद्ध शेतकरी व भा जपा पदाधीरी, व कार्यकर्त्यानी जोरदार घोषणा बाजी केली
यावेळी शे अखलाक शे युसुफ , श्यामराव धनगर , मिलिंद मेढे , अल्लाउद्दीन शेठ, हितेश चौधरी , संजय सोनार , आकाश निमकर , राहुल जंजाळे, सुनिल माळी , विवेक शिवरामे, जय चांदणे , विशाल कुंभार , नरेंद्र बावणे सह शेतकरी उपस्थीत होते
.

Leave A Reply

Your email address will not be published.