चिंता वाढली ! अमळनेर तालुक्यात आज तब्बल ४८ रुग्ण आढळले

0

एकुण बाधितांची संख्या ८१९ तर ५४६ रुग्णांनी केली कोरोनावर मात

अमळनेर :- तालुक्यात आज तब्बल ४८ बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

या रुग्णात जानवे येथील घेण्यात आलेल्या कॅम्प मधील १८, अमळगाव येथील ३, नीम येथील १, मारवड येथील ३, मंगरूळ येथील १, केशव नगर येथील १, विद्या विहार कॉलनी येथील १, संभाजी नगर येथील १, पातोंडा येथील १ व हाय रिस्क १८ असे एकूण ४८ बाधित रुग्ण आढळले आहेत. एकूण बाधित रुग्णांची संख्या ८१९ झाली असली तरी त्यातील ५४६ रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. एकूण ४६ रुग्णांचा मृत्यू झाला असून २२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.