चाळीसगाव येथे आ. मंगेश चव्हाण यांच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : – दुधाला जादा दर मिळावा यासाठी महायुतीच्या वतीने दि 1आँगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. चाळीसगावी देखील आंदोलन झाले या आंदोलनात खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण देखील सहभागी झाले होते. मात्र, आमदार मंगेश चव्हाण यांचा तोल गेला व उद्धव ठाकरे हे रिकामचोट मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केल्याने याचे पडसाद राज्यभर उमटले असून अनेक शिवसैनिकांनी त्यांना मोबाईल वर कॉल करून याचा जाब विचारत निषेध केला.

दि 3 ऑगस्ट रोजी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस च्या वतीने या घटनेचा निषेध करून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीपासून महाविकास आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदार व पोलिस निरीक्षक चाळीसगाव यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले आमदार मंगेश रमेश चव्हाण यांचेवर शिवसेना तालुका प्रमूख रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या विरोधात घोषणा बाजी करून त्यांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा उपप्रमुख आर एल पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत काँग्रेस प्रादेशिक कमिटी सदस्य अशोक खलाणे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल निकम, राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, जि.प सदस्य शशीकांत साळुंके, माजी आ. ईश्वर जाधव, देवेंद्र पाटील,श्याम देशमुख, भगवान बापू पाटील प्रदीप देवराम देशमुख अशोक खलाने धनंजय चव्हाण  शेखर देशमुख, भैय्या साहेब पाटील योगेश राजधर पाटील महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख प्रतिभा पवार, जळगाव शिवसेना माहिला आघाडी नेत्या मनीषा पाटील, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख सविता कुमावत, सुनंदा काटे, मंदा काटे, शैलेंद्र सातपुते, तुकाराम महाराज, अण्णा पाटील, पत्रकार आर.डी. चौधरी, दिनेश घोरपडे, आकाश शेळके मोहन चव्हाण पवन चव्हाण गौरव घोरपडे रघुनाथ कोळी, रामेश्वर चौधरी, निलेश गायके, पुंडलिक कुमावत, जितेंद्र बोंदार्डे, गणेश भवर, रमेश भवर, हरिभाऊ घाडगे, संजय ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे हजर राहू शकले नाही मात्र त्यांनी मोबाईल वरून या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.