छ. शिवाजी महाराज संस्थेकडून यावलचे तहसिलदारांसह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

0

संस्थेचे अध्यक्ष ऍड.देवकांत पाटलांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार

यावल (प्रतिनीधी): कोविड 19 च्या आपत्तीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कौटुंबिक जीवन बाजूला ठेऊन समाजावर आलेल्या महामारीच्या संकटात डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी,पत्रकार व सामाजिक लोक कोरोनाशी दोन हात करत आहात. त्यांचे हे योगदान देश राज्य समरणात राहील त्याच एक छोटासा प्रयन्त म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या संस्थेने तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्यासह व यांच्या शुभ हस्ते  आरोग्य विभागात प्रमुख भुमिका बजावत असल्याबद्दल डॉ. बी.बी.बरेला, येन येस घोडके, विजय वाढे, सूर्यकांत पाटील, शिवानंद काकडे, वैशाली बैरागी, संगीता गावित या सर्व यावल ग्रामीण रुग्णालयातील सर्व कोरोना योध्याचा सत्कार केला.

तहसीलदार साहेब यांनी आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर आणि त्यांच्या टीमला शुभेच्या देत पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या व कार्यक्रमाचे आयोजना बद्दल छत्रपती फाऊंडेशनचे ही कौतुक केले. या कार्यक्रमाला छत्रपती फाऊंडेशनचे संचालक किशोर माळी, हितेश गजरे , विनोद पाटील, राकेश सोनार, चुंचाळे गावाचे पोलीस पाटील गणेश पाटील, आशुतोष पाटील, राजेंद्र पाटील, भूषण पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे  कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.देवकांत पाटील यांनी तर सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले. तर  स्वराज्य फाऊंडेशनचे ऍड.भरत चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.