निपाणे येथे बालकांना सक्षम करण्यासाठी प्रकाश अप्पा घेताहेत योग शिबिर

0

निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : सध्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर बाल वयातील मुलांना सक्षम करण्यासाठी निपाणे येथील निवृत्त कृषी अधिकारी प्रकाश रामदास पाटील यांनी दररोज सकाळी ५. ३० ते ७ वाजेपर्यंत योग शिबिराचे मारोती मंदिरावर दररोज योग शिबिराचे आयोजन केले आहे.

यावेळी योग साधने बरोबर विविध प्रकारचे व्यायाम प्राणायाम सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन केले जात असून शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या कोरोनाच्या भिती पोटी प्रत्येक नागरिक रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत सकस आहारा बरोबर नित्य नियमाने व्यायाम प्राणायाम करत आहेत तसेच आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब करून काही काळा पित आहेत.

यापूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गावात होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप केले होते. त्या गोळ्या महिन्यातुन तिन दिवस घ्याव्यात असे आवाहन केले जात आहे. निपाणे येथे प्रकाश अप्पांनी बाल वयातील मुलांसाठी योग शिबिर सुरू केल्यामुळे मुलांना योग्य व्यायाम मार्गदर्शनासह चांगले संस्कारही दिले जात आहेत. त्यामुळे पालकांनी प्रकाश अप्पांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.